Yavatmal Flood News Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal Weather: पैनगंगा नदीने धारण केलं रौद्ररूप, पुराच्या पाण्यात ४० जण अडकले; पावसामुळे बचावकार्यात अडथळा

Yavatmal Rain: आनंद नगर येथील नागरिक पूराच्या पण्यात अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mahagaon Flood : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. इर्शाळवाडीची घटना ताजी असतानाच आता यवतमाळमधून (Yavatmal) एक चिंताजनक बातमी समोर आलीये. पावसाचा जोर वाढल्याने ४० जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. (Latest Yavatmal Weather News)

पाण्यात अडकले चाळीस जण

मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला आहे. पुराने परिसरात वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकलेत. आनंद नगर येथील नागरिक पुराच्या पण्यात अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

नदीचे पाणी आनंद नदरमध्ये शिरल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दूरदूरवर नजर फिरवल्यास रस्त्यावर कंबरेच्यावर पाणी साचल्याचं दिसत आहे. आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे वाहून गेली आहेत. बचाव पथक पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने बचाव पथकांना नाईलाज झालाय.

महागाव तालुक्यातील हिवरा संगम गट ग्रामपंचायतमधील आनंद नगर येथे पाणी वाढत चालल्याने काही नागरिक बोटीवर बसलेत. या ४० जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

ॲारेंज अलर्ट जारी

मुंबईत (Mumbai) आज ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरूच आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावलीये. त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन मुंबईकरांनी घरातून बाहेर पडावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT