Yavatmal Crime News Shiv Sainik Yogesh Katpelwar was killed by unknown persons Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News: खळबळजनक! भररस्त्यात शिवसैनिकाची हत्या, चाकूने सपासप वार; महिलेसह एक संशयित ताब्यात

Yavatmal Crime News: अज्ञात आरोपींनी भररस्त्यात एका शिवसैनिकाची चाकूने सपापसप वार केले. या घटनेत शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही

Yavatmal Crime News

यवतमाळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपींनी भररस्त्यात एका शिवसैनिकाची चाकूने सपापसप वार केले. या घटनेत शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योगेश नरहरी काटपेलवार (३६) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा संशय पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे. योगेश यांचा मृतदेह घटनास्थळावरून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या एका संशयितासह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहे.

राळेगाव तालुक्यातील सहायक अभियंत्याला मारहाण

वीज वितरणच्या कंपनीच्या सहायक अभियंत्याला एका शेतकऱ्याने केबल वायरने बेदम मारहाण केली आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपरी-सावित्री येथील घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे केला होता. वेळेवर वीज जोडणी न केल्याने शेतकऱ्याने तात्पुरता केबल टाकून शेतात वीजजोडणी केली होती. हा प्रकार सहायक अभियंत्याच्या लक्षात आला.

यावेळी कारवाईसाठी गेलेल्या सहायक अभियंत्यावर शेतकऱ्यांने हल्ला केला. या प्रकरणी राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल करणअयात आला आहे. या घटनेनंतर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT