Shivsena Clash: शिवतीर्थावरील राड्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर; दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवतीर्थावर नक्की काय घडलं याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून पोलीस चौकशी करणार आहे.
Eknath Shinde vs uddhav thackeray group clash at shivaji park police will file case
Eknath Shinde vs uddhav thackeray group clash at shivaji park police will file caseSaam TV
Published On

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळावर गुरुवारी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली. जवळपास ३ ते ४ हा राडा सुरू होता. दरम्यान, या राड्यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Shinde vs uddhav thackeray group clash at shivaji park police will file case
ST Bus Revenue: दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल, १५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी आनंद

मुंबई पोलीस सर्व घटनाक्रम तपासून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवतीर्थावर नक्की काय घडलं याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून पोलीस (Police) चौकशी करणार आहे.

ठाकरे गटाकडून महिला पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली, असा दावा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

दुसरीकडे शिंदे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन राडा घातला. आम्हाला स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने आम्ही त्याठिकाणी गेलो होते, असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. दरम्यान, पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, सरकारने राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर झालेल्या राड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या राड्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली होती. त्यामुळे कायदा आणि प्रश्न सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होऊ शकते.

Eknath Shinde vs uddhav thackeray group clash at shivaji park police will file case
Assembly Election 2023: छत्तीसगड-मध्यप्रदेश विधानसभेसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com