Yavatmal accident Saam TV marathi
महाराष्ट्र

Accident : आंबेडकर जयंतीनंतर घरी जाताना काळाचा घाला, बाप-लेकीचा मृत्यू, महिलेच्या डोळ्यासमोर नवरा अन् मुलीनं प्राण सोडले

Yavatmal accident news today : यवतमाळमध्ये आंबेडकर जयंतीनंतर घरी परतताना झालेल्या भीषण अपघातात बाप आणि सहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

संजय राठोड | यवतमाळ प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Father and infant daughter killed in road accident Yavatmal : यवतमाळमध्ये पांढरकवडा घाटंजी मार्गावरील साखराजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून चारचाकीने आदिलाबादकडे निघाले होते. त्याच वेळी अचानक काळाने घाला घातला. साखराजवळ चारचाकी आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या दुर्दैवी घटनेत सहा महिन्यांची चिमुकली आणि बापाचा जागीच मृत्यू झाला. साईकिरण गुरगुल्ला आणि हंसिका गुरगुल्ला यांचा या अपघातात मृत्यू झाला.

यवतमाळच्या पांढरकवडा घाटंजी मार्गावरील साखरा गावालगत रात्री दरम्यान भीषण अपघात झाला. यात गुरगुल्ला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ट्रक आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात बाप आणि सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी खासगी रूग्णलायात दाखल कऱण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा येथून घाटंजीकडे जाणाऱ्या ट्रकची आणि साखरा गावाकडून येणाऱ्या चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहन पूर्णपणे चकनाचूर झाले. या दुर्घटनेत साईकिरण गुरगुल्ला 32 वर्ष आणि त्यांची सहा महिन्यांची मुलगी हंसिका साईकिरण गुरगुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्का साईकिरण गुरगुल्ला या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गुरगुल्ला कुटुंब साखरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आले होते. कार्यक्रम आटोपून ते परत आदिलाबादकडे चारचाकी वाहनाने जात असताना नियतीने हा त केला. अपघाताची माहिती मिळताच घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर निखिल पुंडे, समाजसेवक मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्यांनी जखमी महिलेला तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT