yadav kalin mandir found in sindkhed raja near buldhana Saam Digital
महाराष्ट्र

Sindkhed Raja : सिंदखेड राजामध्ये सापडलं 13 व्या शतकातील शिवमंदिर, पुरातत्त्व अधिकाऱ्यांची पाहणी

संजय जाधव

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीनपूर्व शिवमंदिर या समाधीसमोर आढळले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याने याची नुकतीच पाहणी केली. (Maharashtra News)

सोळाव्या शतकातील राजे लखोजीराव जाधव यांच्यासह 3 मुलं तसेच नातु यांच्या समाधीचे जतन व संवर्धनाचे कामे करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग उत्खनन करत आहे. याठिकाणी उत्खनन करताना त्यांना हे यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळले.

या मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड व्दोर शिला असून हे मंदिर मोठ्या दगडाने बांधलेले आहे. या मंदिराखाली दगडी फरशी सुद्धा टाकलेली आहे. या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून, उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपितं समोर येऊ शकतात असेही अधिकाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT