World Largest Parad Shivling google
महाराष्ट्र

World Largest Parad Shivling: जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो पारद शिवलिंगाची हरिद्वारमध्ये प्राणप्रतिष्ठा...

5211 Kg Mercury Shivling : हरिद्वारच्या श्री साई शिव गंगा धाममध्ये जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो पारद शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत अध्यात्म, विज्ञान आणि मानवकल्याणाचा संदेश देण्यात आला.

Sakshi Sunil Jadhav

मुंबई : उत्तराखंडातील हरिद्वार येथील श्री साई शिव गंगा धाममध्ये जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो वजनाच्या पारद शिवलिंगाची तीन दिवसीय भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. देशभरातून २००० हून अधिक भाविक, साधक, संत-महंत आणि मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित होते.

ध्यान गुरु रघुनाथ गुरुजी यांनी सुमारे दहा वर्षांच्या साधना, संशोधन आणि पारद विज्ञानाच्या सखोल अभ्यासातून या विशाल पारद शिवलिंगाची निर्मिती केली आहे. शिवलिंग तयार करण्यासाठी पारा, चांदी, सोने तसेच १०८ प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या अर्कांचा वापर करण्यात आला आहे. अध्यात्म क्षेत्रातील जाणकारांच्या मते हे जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग असून भारतीय अध्यात्म, पारद विज्ञान आणि ध्यान परंपरेचे अद्वितीय प्रतीक मानले जात आहे.हा सोहळा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या परंपरेच्या प्रेरणेने, गिरनारचे पूज्य पीर योगी महंत सोमनाथ बापू यांच्या आशीर्वादाने आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाला जगद्गुरू शंकराचार्य स्वामीजी महाराज, श्री सुधांशुजी महाराज, स्वामी कैलाशानंद गिरीजी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, स्वामी रविंद्र पुरीजी महाराज, साध्वी ऋतंभराजी, आचार्य मनीषजी (HIIMS), खासदार राघव चड्ढा, राज्य मंत्री व गंगा सभा अध्यक्ष नितीन गौतम यांच्यासह अनेक संत-महंत आणि मान्यवर उपस्थित होते.रघुनाथ गुरुजी यांनी सांगितले की, हे शिवलिंग केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून ध्यान, आत्मचिंतन आणि सकारात्मक चेतनेचे केंद्र आहे. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी सुमारे १० हजार लोकांच्या सहभागातून भव्य अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले होते.

या उपक्रमाच्या यशात उद्योगपती व समाजसेवक राजीव बन्सल यांचे विशेष योगदान राहिले. समारोपप्रसंगी रघुनाथ गुरुजी यांनी सर्व संत, भाविक, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

याशिवाय आदरणीय दादाश्री, मनोज तोषणीवाल परिवार, मनोज गोहाड, आयजी तकवाले, ममता जिवाल, तरुण भंडारी, अमित अग्रवाल, रमेश सांवरथिया, डॉलरभाई कोटेचा, सुधीर अग्रवाल, राजू ओसवाल, जितेंद्र राठी आणि इतर सहकाऱ्यांचेही मोलाचे योगदान राहिले.

समारोपावेळी "ध्यानातून शांती, शांतीतून सद्भाव आणि सद्भावातून विश्वकल्याण" हा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या सोहळ्याला अध्यात्म, विज्ञान, सेवा आणि मानवकल्याण यांचा ऐतिहासिक संगम असे संबोधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT