Sakshi Sunil Jadhav
आता भाजी विकत घेण्यापासून ते हॉटेलचे बिल भरण्यापर्यंत सगळेच फोनपेचा वापर करतात. डिजीटल पेमेंट करणं खूप सोपं आहे. त्यामुळे लोक कॅशचा जास्त वापर करत नाहीत.
जर तुम्ही सुद्धा फोनपे ने पेमेंट करत असाल तर त्याच्या वॉलेट पॉलिसीत बदल केला आहे हे जाणून घ्या. कारण तुमच्या बऱ्याच दिवस बंद असलेल्या वॉलेटवर मेंटेनन्स फी आकारली जाऊ शकते.
तुम्ही सलग 365 दिवस कोणताही व्यवहार केला नसेल तर तुमचं PhonePe Wallet निष्क्रिय (Inactive) असल्याचं मानलं जातं.
फक्त UPI पेमेंट करणं पुरेसं नाही, कारण बँक खात्यातून केलेले व्यवहार वॉलेट ॲक्टिव्हिटी म्हणून मानले जाणार नाहीत.
वॉलेट अॅक्टीव्ह ठेवायचं असेल तर वॉलेटमधूनच व्यवहार करावा लागतो. त्यामध्ये तुम्ही पेमेंट करू शकता किंवा पैसे जमा करू शकता.
लक्षात ठेवा की, निष्क्रिय वॉलेटवर 100 रुपयांपर्यंत मेंटेनन्स फी घेतली जाऊ शकते.असा कंपनीचा नियम आहे.
पैसे कापण्याच्या 15 दिवस आधी सूचना दिली जाते. त्यामुळे युजर्सना वेळेत कारवाई करण्याची संधी मिळेल.
वॉलेटमध्ये 100 रुपयांपेक्षा कमी पैसे असतील तर जी रक्कम उपलब्ध आहे ती संपूर्ण रक्कम शुल्क म्हणून कापली जाईल.