Sakshi Sunil Jadhav
पावसाळाही आता जवळ आला आहे. या दिवसांमध्ये काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होतच असते.
तुम्ही पुढे दिलेली कुरकुरीत चटपटीत पनीर कोलीवाड्याची रेसिपी नक्कीच बनवून पाहा. ही रेसिपी सोपी आणि पौष्टीक मानली जाते.
पनीर, तेल, मसाला, हळद, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मीठ, जिरं, चाट मसाला, हिंग, मीठ,काळीमिरी पूड, दही, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, बेसन, लिंबाचा रस इ.
ताजं पनीर घेऊन त्याचे जाडसर चौकोनी तुकडे करून घ्या. हे तुकडे बाजूला ठेवून मॅरिनेशनची तयारी करा.
आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करा. त्यामध्ये तेल, आणि सर्व मसाले मिक्स करून घ्या.
आता तयार मिश्रणात दही, बेसन, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर घालून घट्ट् पेस्ट बनवा. त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून त्यांना संपूर्ण मसाला लावून घेऊ.
तयार पनीर तुम्हाला हवे असल्यास २० मिनिटं झाकून ठेवू शकता. त्याने मसाल्याची चव पनीरमध्ये मिक्स होते.
कढईत गरम तेल करून मॅरिनेट केलेले पनीर त्यामध्ये हळूहळू सोडून फ्राय करा. त्याचा रंग बदलला आणि ते कुरकुरीत झाले की गरमागरम जेवणासोबत किंवा नाश्त्यासाठी सर्व्ह करा.