Womens Day Special Saam Tv
महाराष्ट्र

Womens Day Special: बुलढाण्यातील 'सुपरमॉम'! मुलाला IAS करायचं म्हणून आई दिवसरात्र चालवते रिक्षा; डोळ्यात पाणी आणणारा 'तिचा' संघर्ष

Success Story Of Rizwana Shaikh: बुलढाण्यातील रिजवाना शेख या मुलाच्या स्वप्नासाठी दिवसरात्र कष्ट करतात. मुलाला आयएएस करण्यासाठी त्या खूप मेहनत करतात.

Siddhi Hande

मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरात महिला अग्रेसर आहेतच मात्र बुलढाण्यासारख्या शहरात देखील महिला एक पाऊल पुढे आहेत याचे उदाहरण तुम्हाला बुलढाणा चिखली रोडवर पाहायला मिळेल कारण एक जिद्दी आई आपल्या मुलाला चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी आणि पुढे ते IAS बनावा यासाठी ऑटो रिक्षा चालवते त्या आईच नाव आहे रिजवाना शेख.

बुलढाण्यातील रिजवाना शेख यांचा प्रवास सर्वांनाच थक्क करेल. आपला मुलगा IAS व्हावा हे ध्येय उराशी बाळगलेल्या या ताईंनी आतापर्यंत कुटुंबाला हातभार लागावा यासाठी बरीच कामे केली. मात्र आता त्यांच्यापुढे ध्येय आहे ते आपल्या मुलाला आयएएस बनवायचे. त्यामुळे त्याला चांगल्या शाळेत शिकवावे लागेल . आणि चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायची म्हणजे लाखो रुपये डोनेशन. त्यामुळे पतीचा पगार पुरत नाही म्हणून या ताईंनी ऑटो चालवण्याचा निर्णय घेतला.

गेल्या वर्षभरापासून त्यांच्या रिक्षामुळे मुलांच्या शाळेची फी भरली जात आहे. ऑटो रिक्षा चालवताना चांगले वाईट सगळेच अनुभव येतात मात्र रिजवाना ताई त्या कशालाच घाबरत नाहीत. परिस्थितीशी दोन हात करत त्या ताठ मानेने हा व्यवसाय करतात... त्यांच्या समाजाच आणि पतीचा मोठं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे .

मुलाला चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी या ताईंचे कष्ट कमालीचे आहेत. राजमाता जिजाऊंचा माहेरघर असलेला बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊंच्या या लेकीने समाजासमोर एक आदर्श ठेवलाय, असे प्रवासी म्हणतात.

मोठ्या शहरात बरीच उदाहरणे पाहायला मिळतील मात्र बुलढाणा सरख्या ग्रामीण टच असलेल्या भागात रिजवाना शेख यांच्यासारख्या जिद्दी आणि ध्येयवादी महिला ऑटो रिक्षा चालवून आपल्या मुलाला IAS बनवण्याची स्वप्न पाहतात आणि त्यासाठी धडपड करतात हे अभिमानास्पद आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Bhurka Recipe: जेवताना तोंडी लावायला बनवा झणझणीत लसणाचा भुरका

Maharashtra Live News Update फलटण आत्महत्या प्रकरणात फडणवीसांचे SIT गठित करण्याचे आदेश

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी शरद पवारांचीच; मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

PM Narendra Modi : आजारातून लवकर बरे व्हा; संजय राऊतांची प्रकृती गंभीर, PM नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट

French fries Recipe : घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत फ्रेंच फ्राइज, एक घास खाताच महागड्या हॉटेलची चव विसराल

SCROLL FOR NEXT