Kolsewadi Police : जामिनावर सुटताच पुन्हा रिक्षा चोरी; कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात

Kalyan Kolsewadi News: राजेश जाधव याच्याकडून चोरी केलेल्या चार रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या. राजेशने आणखी काही रिक्षा चोरी केला असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Kolsewadi Police
Kolsewadi PoliceSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणमधील कोळशेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चोरीच्या घटना वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरु असताना एक रिक्षा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची चौकशी केली असता चार रिक्षा चोरी केल्या असल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे जामिनावर सुटल्यानंतर रिक्षा चोरीचे काम त्याने केले. कोळशेवाडी पोलिसांनी या रिक्षा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला रिक्षा चोरटा राजेंद्र जाधव असे नाव असून तो डोंबिवली येथे राहणारा आहे. कल्याण- डोंबिवली परिसरातून रिक्षा चोरी झाल्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या होत्या. या रिक्षा चोरी करून तो कर्जत परिसरात विकत होता. रिक्षा चोरीच्या घटना वाढल्याने डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांचे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते. या दरम्यान रिक्षा चोरी करणारा सराईत चोरटा राजेश जाधव डोंबिवलीत राहत असल्याची माहिती मिळाली. 

Kolsewadi Police
Cyber Fraud : विदेशात नोकरीचा बनाव; महिलेची ३० लाख रुपयात फसवणूक

चोरीच्या चार रिक्षा केल्या हस्तगत  

यानंतर पोलिसांच्या पथकाने राजेश जाधव याला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच जाधवने रिक्षा चोरीची कबुली दिली. पोलिसांनी राजेश जाधव विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. राजेश जाधव याच्याकडून चोरी केलेल्या चार रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या. राजेशने आणखी काही रिक्षा चोरी केला असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Kolsewadi Police
Saam Impact : दोन वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळेबाबत आमदार मिटकरींचे शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षकावर कारवाईची मागणी

यापूर्वीची रिक्षा चोरीत झाली होती अटक 

राजेश जाधव कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा चोरायचा आणि त्या रिक्षा कर्जत परिसरात विकत होता. राजेश जाधव विरोधात याआधी देखील डोंबिवली, मानपाडा, कोळशेवाडी परिसरात रिक्षा चोरी संदर्भात गुन्हे दाखल आहेत. त्याला याआधी देखील रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा रिक्षा चोरी करणं सुरू केलं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com