Saam Impact : दोन वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळेबाबत आमदार मिटकरींचे शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षकावर कारवाईची मागणी

Akola News : काही महिन्यांपूर्वी या शाळेतील महिला शिक्षिका सेवानिवृत्त झाली. तेव्हापासून या शाळेत अद्याप शिक्षकाची नेमणूक नाही. दुसऱ्या शाळेवरून इतर शिक्षक इथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येतो
Saam Impact
Saam ImpactSaam tv
Published On

अक्षय गवळी

अकोला : अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने पाच वाजेपर्यंत असणारी शाळा दुपारी दोन वाजताच बंद करण्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत 'साम टीव्ही'ने प्रसारित केलेल्या बातमीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दादा फुसे यांना पत्र लिहीत संबंधित शिक्षकावर कारवाईची मागणी केली. 

अकोला जिल्ह्यातील जऊळखेड गावात असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंत एकत्रित २७ विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक एकच. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी या शाळेतील महिला शिक्षिका सेवानिवृत्त झाली. तेव्हापासून या शाळेत अद्याप नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. दुसऱ्या शाळेवरून इतर शिक्षक इथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येतो. मात्र तोही शिक्षक दुपारी दोन वाजेपर्यंतच शाळा चालवत आहे. याबाबत साम टीव्हीने बातमी प्रसारित केली.

Saam Impact
Dombivali Crime : टार्गेट पूर्ण करून मागितले अधिकचे काम; मॅनेजरकडून महिलेसोबत धक्कादायक कृत्य, डोंबिवली एमआयडीसीतील घटना

नेमकं मिटकरींनी काय म्हटलं पत्रात?

अकोला जिल्ह्यातील जऊळखेड गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे असणारी महिला शिक्षिका काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाली आहे. तेव्हापासून या शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध नाही. दुसऱ्या शाळेवरुन शिक्षक येथे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी येतात. परंतु तो शिक्षकही दुपारी २ वाजेपर्यंत शाळा चालवितात. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणारी शाळा दुपारी २ वाजतांच बंद केली जाते. तसेच १ ते चौथी पर्यंतची शाळा एकाच खोलीत भरविली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी उत्तम शिक्षण मिळण्यापासून वंचित राहत आहेत. 

Saam Impact
Cyber Fraud : विदेशात नोकरीचा बनाव; महिलेची ३० लाख रुपयात फसवणूक

शिक्षकावर कारवाईची केली मागणी 

सदर प्रकाराबाबत स्थानिक वरिष्ठ अधिकारी, केंद्र प्रमुख यांचे जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश द्यावेत; अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com