पिंपरी चिंचवड : वेगवेगळे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. यातच विदेशात जॉब देण्याच बनाव करुन एका महिलेची तब्बल ३० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर भागामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने जॉबसाठी वेगवेगळ्या वेब साइटवर अकाउंट उघडून आपली माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर एकाने महिलेसोबत संपर्क साधला. यात बाहेर देशात काम असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला रजिस्ट्रेशन फी, व्हिसा फी, जीएसटी चार्जेस अश्या वेगवेळ्या कारणे देऊन महिलेकडून ऑनलाइन पद्धतीनं २९ लाख ९७ हजार रुपये घेतले.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
दरम्यान रक्कम घेऊन नोकरीबाबत काहीच निर्णय नसल्याने सदर महिलेने संबंधितांशी संपर्क साधला. मात्र कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्स न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर संत तुकाराम नगर पोलिसांनी दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केले असून आरोपीचा शोध घेत आहे.
विदेशी ॲपच्या माध्यमातून तरुणांना लाखोंचा गंडा
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बॅटिंगच्या माध्यमातून अनेक तरुणांना लाखोंचा चुना लागल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पद्धतीने बॅटिंगच्या लिंक्स काही दिवसांपूर्वी वायरल केल्या जात होत्या. या लिंकच्या माध्यमातून अनेक तरुणांनी विदेशी ॲप डाऊनलोड करत त्यावर ऑनलाइन जुगार खेडला. मात्र यात अनेक तरुणांना लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या संदर्भात कोणीही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.