Horoscope : वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'या' राशींना मिळणार खूप पैसा; तर 'या' राशीना करावे लागतील कष्ट

Saam Tv

मेष

नवीन वर्षाचा पहिला दिवस फिरण्यात आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल.

मेष राशी | saam tv

वृषभ

नवीन वर्ष भाग्य उजाळणार आहे. आजचा दिवस असाच सुंदर जाणार आहे. लक्ष्मी उपासना विशेष फलदायी ठरेल.

वृषभ राशी | saam tv

मिथुन

थोडा संकटांचा आणि अडचणींचा आजचा दिवस आहे. पण नव्या दमाने नव वर्षाची सुरुवात करताना या छोट्या गोष्टींना घाबरून जाऊ नका.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

संसारासाठी आनंद आणणार असा नवीन वर्षात नवा संकल्प करा. जोडीदारासोबत दिवस आनंदी राहील. कोर्टाचे निकाल सुद्धा मनाप्रमाणे लागतील.

कर्क राशी | saam tv

सिंह

आपल्या राशीचे गुण आहेत ते झाकले जाणार नाहीत. नवीन संकल्प आणि स्वप्ने मोठी आशा आज तुम्ही बाळगाल. गुप्त शत्रूंवर मात कराल.

सिंह राशी | saam

कन्या

नवीन वर्षाची सुरुवात पैशाने होईल. धनप्राप्तीच्या दृष्टीने सकारात्मक दिवस आहे. कलाक्षेत्रात प्रगती होईल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तुळ

नवीन वर्षाच्या संकल्प मध्ये घरासाठी नवीनपण आणण्याचा प्रयत्न कराल. जुन्याचे नवे करणे किंवा नवीन घर, नवीन गाडी खरेदीचे योग आहेत. त्या दृष्टीने आज निर्णय घ्या. दिवस सुखाचा आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

दहा जणांना पुरून उरणारी कामे आपल्याकडून नवीन वर्षात नेहमीप्रमाणे घडतीलच. भावंडांच्या सहकार्याने आज आपण पुढे जाल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

लक्ष्मी आपल्यावर सहज प्रसन्न होईल. नवीन वर्ष असेच धनयोगाच्या दृष्टीने फायदेशीर जाईल. आजही पैशाची आवक जावक चांगली आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

नव्या संकल्पामध्ये स्वतःसाठी काम करण्याचे निर्णय घ्यावेत. आजचा दिवस असाच आहे आपली महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास याला नवीन पंख द्या.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

ठरवलेल्या गोष्टी तशाच घडतील असा आजचा दिवस नाही. कदाचित नवे संकल्प पुर्ण होणार नाहीत. पण दूरच्या दृष्टीने विचार करा नव्या वर्षाचे स्वागत हसत मुखाने करा.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

नवीन वर्षाच्या संकल्पना मित्र-मैत्रिणी स्नेहीजन यांना विशेष प्राधान्य राहील. माणसे जोडण्याचा प्रयत्न कराल. आजचा दिवस सुद्धा याच दृष्टीने महत्त्वाचा आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी परिधान करा पांढरे कपडे; लक्ष्मीची राहील विशेष कृपा

Girls In Saree | Picsart
येथे क्लिक करा