Rani Kale from Nashik’s Ghoti, who allegedly ended her life after continuous harassment from in-laws over giving birth to a girl. Saam Tv
महाराष्ट्र

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Nashik Ghoti Detailed Suicide Case Of Rani Kale: नाशिकच्या घोटीमध्ये राणी काळे यांनी सासरकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विषप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

नाशिक: राज्यात डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत असताना नाशिकच्या घोटी मध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. मुलगी झाल्याच्या कारणासह सासरकडून सुरू असलेल्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचललं. विवाहित महिलेच्या नातलगांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या घोटीत राणी समाधान काळे यांनी विषप्राषन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. राणी काळे यांचा विवाह डिसेंबर २०२२ मध्ये घोटीतील समाधान काळे यांच्यासोबत झाला होता. सुरुवातीच्या काळात अपत्य होत नसल्याने सासरच्यांकडून विवाहित राणीकाळेचा छळ सुरू होता. अशातच राणी काळे यांना मुलगी झाली. सुरुवातीला अपत्य न होण्यावरून आणि नंतर मुलगी झाली या कारणांवरून राणीचा छळ सुरू होता, असा आरोप तिच्या नातलगांनी केलाय. राणी काळेच्या आत्महत्या नंतर घोटी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात पतीसह सासू, दीर आणि तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घोटी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

राज्यामध्ये पुण्यातील वैष्णवी हगवणे, नाशिकची भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरण राज्यात बहुतांश दिवस चर्चेत राहिलंय. त्यानंतर आता नुकतेच मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. कठोर कायदे करूनही सासरी होणारा त्रास कमी व्हायला तयार नाहीये. त्यात आता नाशिकच्या घोटीतील राणे काळे या महिलेच्याही आत्महत्येची भर पडलीये. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: ११ वाहनांनी एकमेकांना धडक देत घेतला पेट; १३ प्रवासी जिवंत जळाले, प्रत्यक्षदर्शिने सांगितलं नेमकं काय घडलं?

New District: राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

Methi Usal Recipe: झणझणीत मेथी उसळ कशी बनवायची? वाचा गावरान रेसिपी

मध्यरात्री रक्तरंजित थरार! २ सख्ख्या भावांवर अंदाधुंद गोळीबार, जागीच सोडले प्राण

Ranapati Shivray: दिग्पाल लांजेकरांच्या 'श्री शिवराज अष्टक'मधील सहावे पुष्प भेटीला; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा टिझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT