सचिन बनसोडे, साम टीव्ही
प्रस्तुतीदरम्यान 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने शहरात श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर आणत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉक्टरच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात प्रसूतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. जोपर्यंत डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. नातेवाईकांच्या भूमिकेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान नवजात बालकाची प्रकृती देखील चिंताजनक असून लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावेळी नातेवाईकांनी माहिती दिली की, ज्यावेळी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आमच्या पेशंटचा मृत्यू हा श्वासनलिकेत अन्न अडकल्याने हा मृत्यू झाला आहे. जर अन्न अडकले होते. तर डॉक्टरांनी ते वेळेवर का काढले नाही? तसेच महिलेला त्रास होत असताना डॉक्टरांनी आजूबाजूच्या सर्व रुग्णांना बाहेर काढून दिले, इतकेच नाही तर त्याठिकाणी एक सीझर झालेली पेशंट होती. तिला देखील त्यांनी बाहेर काढून दिले. काही वेळाने आणखी दोन ते तीन डॉक्टर आले. मात्र थोड्यावेळाने आम्हाला सांगण्यात आले की, महिलेचा मृत्यू झालाय आणि त्याचे डॉक्टरांनी चार कारणे सांगितले. हे सर्व कारणे समाधानकारक नसून संबधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या बहिणीचा मृत्यू झाला असून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
यावेळी श्रीरामपुर तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये सिव्हिल सर्जनचा जो पर्यंत अहवाल येत नाही तो पर्यंत गुन्हा दाखल करता येत नाही, रुग्णाला ज्यावेळी त्रास सुरू झाला त्यावेळी कोणते कोणते उपचार देण्यात आले याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.