Police personnel outside Sai Bhakt Niwas in Shirdi after the arrest of the accused in a molestation case involving a woman devotee from West Bengal. saam tv
महाराष्ट्र

पश्चिम बंगालहून साईंच्या दर्शनासाठी आली, पण मंदिरात कंत्राटी कर्मचाऱ्याकडूनच विनयभंग, आरोपी पठाणच्या आवळल्या मुसक्या

Woman Devotee Molested In Shirdi Sai Bhakt Niwas: शिर्डीतील साई संस्थानच्या भक्त निवासात पश्चिम बंगालहून आलेल्या महिला भाविकेसोबत विनयभंगाची धक्कादायक घटना घडली असून काही तासांतच आरोपी अमन पठाणच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी: पश्चिम बंगाल येथून कुटुंबीयांसोबत शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या तरुणीचा साई संस्थानच्या भक्त निवासात विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून कंत्राटी सफाई कर्मचारी आरोपी अमन पठाण याच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान साई संस्थानच्या भक्त निवासात कंत्राटी सफाई कर्मचारी असलेल्या आरोपी अमन पठाण याला निलंबित करण्यात आले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी घटनेचा निषेध केला असून, आरोपीवर कठोर कारवाईची करण्याची मागणी केली आहे..

नेमके प्रकरण काय?

पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील रहिवासी असलेले एक कुटुंब ४ जून रोजी शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. ते भक्तनिवासमध्ये मुक्कामी होते. ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पीडितेचे आई-वडील आणि बहीण साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते, तर पीडिता रूममध्ये एकटीच होती. या दरम्यान, रूमची बेल वाजल्याने पीडितेने दरवाजा उघडला. समोर उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने (आरोपी) मला तुझ्याशी बोलायचे आहे, मी रूममध्ये येऊ का? असे विचारले.

पीडितेने नकार दिला असता, त्याने तिला रूम नंबर २०४ जवळ येण्यास सांगितले. पीडिता तेथे गेली असता, आरोपीने तिचा हात धरून तिला रूममध्ये ओढले आणि तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच माझा मोबाईल नंबर राहूदे, माझे नाव अमन पठाण आहे, असे सांगितले. पीडिता घाबरून जोरजोरातओरडू लागली आणि आपल्या रूममध्ये पळून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिममध्ये गोठ्याला भीषण आग; तीन बैलांचा होरपळून मृत्यू, लाखोंचे नुकसान

Skin Care: जर तुम्हाला ग्लोईंग सॉफ्ट त्वचा पाहिजे? तर संध्याकाळी एक चमचा खा हे पाच सीड्स

पावसाळ्यात नेसा 'या' 5 हलक्या फुलक्या साड्या

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांना मारहाण; अज्ञात व्यक्तीने कानशिलात लगावली, VIDEO

मोठी बातमी! सहलीला निघालेल्या भाजप नगरसेवकांची बस हॉटेलच्या भिंतीला धडकली

SCROLL FOR NEXT