raj thackeray uddhav thackeray  Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Thackeray Brothers Reunite: २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. मराठी मेळाव्यात युतीचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरेंच्या सूचनेमुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Bhagyashree Kamble

त्रिभाषा सूत्रावरून निर्माण झालेल्या वादानंतर तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी आपल्या भाषणातून मराठी माणसासाठी एकत्र येत असल्याचं जाहीर केलं. मात्र, यावेळी राज किंवा उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले नाही. त्यातच आता राज ठाकरेंनी, 'युतीविषयी कोणतीही वक्तव्ये करू नयेत' अशा स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे सध्या ठाकरे सैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

२००५ नंतर विभक्त झालेले ठाकरे बंधू वरळी डोममध्ये विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. एकाच व्यासपीठावर येत भाषणामधून युतीचे संकेत दिले. मात्र, युतीबाबत त्यांनी स्पष्ट बोलण्यास टाळलं. दरम्यान, दोघांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवाव्या, अशी इच्छा नेत्यांपासून जनसामान्यांनी व्यक्त केली. अशातच आता राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशांमुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीविषयी कोणतीही वक्तव्ये करू नयेत, असे स्पष्ट आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही नेत्याने युतीबाबत काही बोलायचे असल्यास, आधी माझी परवानगी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात, मराठी माणसाची एकजूट आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण व्हावं, असे भावनिक आवाहन यावेळी त्यांनी केले. पण भविष्यात युती कायम राहील, याबाबत त्यांनी कोणतेही ठोस विधान केले नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीसाठी पुढाकार घेतला जात असला तरी, राज ठाकरेंची भूमिका अंतिम आणि निर्णायक ठरणार आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT