will LPG be stopped in India after PNG mandatory rule : गॅस टंचाईनंतर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आलंय. इमारतींसाठी आता पीएनजी म्हणजेच पाईप नॅच्युरल गॅस बंधनकारक करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांचं टेन्शन वाढलंय. LPG आणि PNG बाबत सरकारचा मास्टर प्लॅन काय आहे ?पाहूया एक रिपोर्ट...
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामान्य लोकांची चिंता वाढवणारे एक वक्तव्य केले आहे. तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो, असे संकेत छगन भुजबळ यांनी दिले. यावेळी भुजबळ यांनी एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करत राज्यातील पीएनजी गॅसच्या जोडण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली.
देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांचा एलपीजी गॅसचा पुरवठा ,सुरळीत राहण्याच्या उद्देश्यानं केंद्र सरकारने पाईप नॅच्युरल गॅस म्हणजेच पीएनजीबाबत सर्वच राज्यांना महत्वाची सूचना केली आहे. पीएनजी गॅस तुलनेत स्वस्त असल्यानं त्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी सरकारचा प्रयत्न करत असून त्याचात एक भाग म्हणून पीएनजी जोडणीसाठी 24 तासात परवानगी मिळणार आहे.
इंधनाच्या दृष्टीने पीएनजीचे का महत्वाचं आहे पाहूया
पीएनजी हा पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू आहे. जो प्रामुख्याने मिथेनपासून बनलेला असतो. तो पाईपलाईनद्वारे थेट घरांच्या आणि व्यावसायिक आस्थापनांच्या स्वयंपाकघरांमध्ये पुरवला जातो, ज्यामुळे सिलेंडर बुक करण्याचा किंवा बदलण्याचा त्रास वाचतो. तो एलपीजीपेक्षा अधिक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल आहे. सुरक्षेच्या दृष्टीनंही पीएनजी हवेपेक्षा हलका असल्याने गळती झाल्यास त्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे एलपीजीच्या तुलनेत आगीचा धोका कमी होतो. एलपीजी सिलेंडरपेक्षा १०-१५% स्वस्त आहे.
मुंबईत सध्या एलपीजीचा दर 14.2 किलो घरगुतीसाठी 912 तर 19 किलो व्यावसायीक सिलेंडरसाठी 1,836 रुपये आहे. तर पीएनजीचा दर प्रत्येक स्टॅण्डर्ड क्युबिक मीटरसाठी 50 रुपये आहे.
आता ज्या भागात PNG पाईपलाईन उपलब्ध आहे. तिथे LPG ऐवजी पाईपद्वारे येणारा गॅस वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. 3 महिन्यांत PNG वर शिफ्ट न झाल्यास घरगुती LPG सिलिंडर कनेक्शन कायमचे बंद होण्याची भिती आहे. त्यामुळे इंधन टंचाईच्या स्थितीत सामान्यांचं टेन्शन वाढलंय.
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.