Shambhuraj Desai , Ajit Pawar, Satara, Satara Political News saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : 'अजित पवार साता-याचे पालकमंत्री ? तुम्हांला काय वाटतं...' (पाहा व्हिडिओ)

वज्रमुठीतील जो महाराष्ट्राला हवाहवासा चेहरा होता तोच महायुतीमध्ये आलेला आहे असे मंत्री देसाईंनी नमूद केले.

ओंकार कदम

Satara News : शरद पवार महत्त्वाचे आहेत पण सर्वच महायुतीत घेतले तर समोर ब्लँक राहील. सध्या महाराष्ट्रात चालणार नाणं म्हणजे अजित पवार (NCP Ajit Pawar Politics) आहेत असे साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नमूद केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. (Maharashtra News)

काेणी नाराज नाही

देसाई म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत महायुतीतील त्यांचे असणारे महत्त्व स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे (ncp) येण्यामुळे आमच्यातील कोणीही आमदार नाराज नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही सर्वजण समाधानी आहोत. आम्ही सर्वांनी आमच्या माना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर ठेवले आहेत असेही त्यांनी नमूद केले.

...ताे चेहरा महायुतीत

देसाई म्हणाले शिवसेना भाजप ही महायुती शपथ घेण्याआधी 9 पक्षांची होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष वाढला आणि वज्रमुठ ढीली झाली. वज्रमुठीतील जो महाराष्ट्राला हवाहवासा चेहरा होता तोच महायुतीमध्ये आलेला आहे. यामुळे आम्ही सर्वांनी समजावून घेतल आहे. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे स्वागत केले आहे असेही देसाईंनी नमूद केले.

धाेरण बदलले

महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार यांचा विचार वेगळा होता. आता विचार वेगळा आहे. त्यांचे विचार धोरण बदलल्यामुळे बदलत्या धोरणानुसार बदलावे लागते असे देसाईंनी स्पष्ट केले. शरद पवार हा महत्त्वाचा चेहरा आहे पण सर्वच चेहरे महायुतीत आले तर पुढे ब्लँक राहील. सध्या चालणार नाणं बघणं गरजेचं आहे. अजितदादांची कामांची पद्धत वेगळी आहे. आमचं सरकार डबल इंजिनचं बुलेट ट्रेन झाली आहे असे देसाईंनी नमूद केले.

शिंदे गट नाराज अशा वावड्या उठवल्या जात आहेत. संजय राऊत यांनी 17 जण संपर्कात असून 4 जणांनी मला फोन केला असल्याचे ते म्हणत असतील तर त्यांनी संपर्कात असणाऱ्यांची नावे जाहीर करावी असे आव्हान देसाईंनी राऊतांना दिले. राऊत पोपट हा खोट्या चिट्ट्या काढतो याआधी देखील विनायक राऊतांनी (vinayak raut) अनुभव घेतलाय असे देसाईंनी नमूद केले.

आदित्य ठाकरेंना संजय राऊतांची सवय लागली

आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना महाविकास आघाडी मधील जागा समजली का? महाविकास आघाडी आता तुटायला लागली. त्यामधील एक एक मोहरा बाजूला पडतोय. स्वतःचं बघा ना स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून अशी सवय आदित्य ठाकरेंना देखील आता संजय राऊत (sanjay raut) यांची लागल्याचा टाेला देसाईंनी लगावला.

पालकमंत्री मुख्यमंत्री ठरवतील

साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. त्याबाबत सातारा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले पालकमंत्री बदलाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील.

अन्य प्रश्नावर देसाई म्हणाले अजित पवार यांना राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव हे सध्यातरी मिळू शकते असं आम्हाला वाटतं कारण 40 हून अधिक आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यांना चिन्ह मिळावे या आमच्या शुभेच्छा आहेत.

नीलम गोरे (neelam gorhe) यांचं फोन मी स्वागत केलं आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करणारी शिवसेना आहे हे यातून स्पष्ट होतं. जागा वाटपाबाबत सर्व अधिकार हे आमच्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT