Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणीत वाढ? क्लीन चीटला विरोध, विधानसभेच्या तोंडावर चक्रव्युहात अडकणार दादा?

Shikhar Bank Scam : विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झालीये. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी EOWनं दिलेल्या क्लीन चिटला विरोध करण्यात आलाय.

Tanmay Tillu

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झालीये. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी EOWनं दिलेल्या क्लीन चिटला विरोध करण्यात आलाय. यामुळे अजित पवारांच्या चिंतेत वाढ झालीये. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र याला विरोध करत 4 नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी महायुतीसोबत घरोबा केला. मात्र आता विधानसभा येईपर्यंत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलंय. आता अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का इथपर्यंत चर्चा रंगू लागल्यात.

मिळालेल्या माहितीनुसार, शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती, त्याला आता नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे. सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

याआधी शिखर बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी खटला बंद करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. यानंतर अजित पवार, सुनेत्रा पवारांसह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती. यानंतर ईडी कडून क्लीन चिटला आक्षेप घेण्यांत आला. क्लीन चिटला विरोध करणाऱ्या 4 नव्या याचिका आता मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशावरुन आधीच खदखद सुरु असतानाच आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळतेय. ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांभोवती रचलेलं हे चक्रव्युह दादा भेदणार की, चक्रव्युहात अडकणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT