Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: लग्नाआधी 7 जन्माचं वचन देणाऱ्या पतीचा खरा चेहरा उघड; प्रेमविवाहानंतर अवघ्या 3 महिन्यात पत्नीनं जीवन संपवलं

प्रेमविवाहाचा अवघ्या 3 महिन्यात शेवट झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

विनोद जिरे

Beed News Today: प्रेमविवाहाचा अवघ्या 3 महिन्यात शेवट झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केलेल्या 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर ही आत्महत्या पती आणि सासूच्या जाचास कंटाळून केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. (Latest Marathi News)

ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या ठोंबळसांगवी गावात घडली आहे. याप्रकरणी बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यात पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीडच्या (beed) आष्टी तालुक्यातील कडा येथील तरुणी आणि सांगवी येथील एका तरुणाचे एकमेकांवर प्रेम जडले होते. याच प्रेमाचे रूपांतर 3 महिन्यांपूर्वी लग्नात झाले होते. एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेल्या दोघांनीही सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. मात्र, काही दिवसातच घरात कलह निर्माण झाला. (Beed Crime News)

यामुळं कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पती नगरला, तर सासू शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता नवविवाहित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तरुणीच्या मामाने सदरील आत्महत्या ही पती आणि सासूच्या जाचास कंटाळून केल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस (Police) ठाण्यात पती आणि सासू यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT