रायगड राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad Unlock: प्रशासनाची मेहनत अन् रायगड जिल्हा शंभर टक्के अनलॉक!

रायगड जिल्हा शंभर टक्के अनलॉक!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड: जिल्हा प्रशासनाने कोरोना (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला आहे. प्रशासनाने लसीकरण मोहिमही (Vaccination Drive) मोठ्या प्रमाणात राबविल्याने आज रायगड (Raigad) जिल्हा हा दोन वर्षानंतर शंभर टक्के अनलॉक (Unlock) झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार, ऐतिहासिक गड, किल्ले, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, मनोरंजक पार्क पुन्हा एकदा बहरणार आहेत. (Raigad District Covid Restrictions Free)

मार्च 2020 साली कोरोनाची पहिली लाट आली आणि राज्यासह रायगड हा पूर्णतः लॉक झाला. सर्व व्यवहार ठप्प झाले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नव्याने आलेल्या कोरोना विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने पहिली लाट (First Wave) हळूहळू रोखण्यात यश मिळविले. त्यामुळे काही प्रमाणात हळूहळू व्यवहार सुरू झाले. त्यानंतर दुसरी लाट आली आणि पुन्हा संचारबंदी (Curfew) लागू झाली आणि पुन्हा संचारबंदी लागू झाली.

हे देखील पहा-

कोरोना प्रतिबंध लस उपलब्ध झाल्याने जिल्हा प्रशासनाने कोव्हिड लसीकरण मोहीम जोरदारपणे राबवली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आले. जिल्ह्यात पहिला डोस 95 टक्के तर दुसरा डोस 80 टक्के नागरिकांनी घेतला आहे. लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शासनाने 70 टक्के लसीकरण पूर्ण झालेले जिल्हे अन लॉक करण्याची परवानगी दिली यामध्ये रायगड जिल्हाही आहे. (Raigad News In Marathi)

त्यामुळे दोन वर्षानंतर रायगड जिल्हा हा पूर्णतः अनलॉक झाला आहे. मात्र तरीही "नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन काटेकोर पणे करावे जेणेकरून पुन्हा जिल्हा बंद करण्याची वेळ येऊ नये." असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT