Uddhav Thackeray Kalaram Mandir Visit Saam Tv
महाराष्ट्र

Kalaram Mandir: उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न जाता काळाराम मंदिरातच जाण्याचा निर्णय का घेतला?

Uddhav Thackeray Kalaram Mandir Visit: 22 जानेवारी अयोध्येत श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे अयोध्येत न जाता, नाशिक येथील काळाराम मंदिरात महापूजा करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> प्रसाद जगताप, मुंबई

Uddhav Thackeray Kalaram Mandir Visit:

22 जानेवारी ही तारीख देशाच्या राजकारणात ऐतिहासिक ठरणार आहे. याच दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. पण याच दिवशी उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिराला न जाता, नाशिक येथील काळाराम मंदिरात महापूजा करणार आहेत. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनाही आग्रहाचं आमंत्रण दिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात देशातल्या अनेक महत्वाच्या मान्यवरांना निमंत्रीतही करण्यात आलंय. नेमकं याच सोहळ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात महापूजेची घोषणा केली. त्यांनी या महापूजेत देशाच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनाही निमंत्रीत केलंय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मोदी आणि ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाणं याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही त्यापाठोपाठ होण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी या दोन्ही नेत्यांकडून हिंदुत्वाचं कार्ड अधिक प्रबळ केलं जातंय का? अशा चर्चांनाही उधाण आलंय. (Latest Marathi News)

काळाराम मंदिराचं ऐतिहासिक महत्व

काळाराम मंदिराला धार्मीक आणि सामाजिक महत्व आहे. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवा म्हणन 2 मार्च 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनाला सावरकरांनीही जाहीर पाठिबा दिला होता. यावरुन दलित बांधवांसाठी काळाराम मंदिर हा सामाजिक क्रांतीचा विषय आहे.

नेमकं याच ठिकाणी 22 जानेवारीला काळाराम मंदिराता महापूजा करुन उद्धव ठाकरेंना दलित बांधवांना आपल्या बाजूने खेचायचं आहे का? राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांना या महापूजेचं निमंत्रण देऊन भाजपा आदिवासी समाजातून आलेल्या महिला राष्ट्रपतींना सन्मानाची वागणूक देत नाही, हे अधोरेखीत करायचं आहे का? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातायेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात थंडीचा कडाका; 'दिट वाह' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : नंदुरबारमध्ये वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर मतदारांची प्रचंड गर्दी

महाडमधील राडा, आधी कार्यकर्ते भिडले आता नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; तटकरेंचा गोगावलेंवर घणाघात

Maharashtra Live News Update: जिल्ह्यात राजकीय संस्कृती आहे आम्ही इतरवेळी खेळीमेळीतच असतो- नितेश राणे

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर पुन्हा संतापल्या, मुक्ताईनगरमध्ये शिंदे गट आणि भाजपचा हायव्होलटेज राडा|VIDEO

SCROLL FOR NEXT