Sharad Pawar NEWS Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar Resigns: शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? 'या' ४ नावांची होतेयं सर्वाधिक चर्चा

Who is Next President Of NCP After Sharad Pawar: पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Gangappa Pujari

Sharad Pawar will retire as NCP president: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते भावुक झाले आहेत.

शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्ते, पक्षाचे सर्वच नेते आणि मंत्र्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. तसेच या निर्णय तात्काळ मागे घेण्याची विनंती केली आहे. परंतु याबाबत शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने सध्यातरी हा निर्णय कायम असेल. (Latest Marathi News)

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मोठ्या निर्णयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. तसेच पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये पाच नेत्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. पाहूया कोण आहेत ते नेते...

सुप्रिया सुळे...

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील मोठ्या नेत्या आहेत. तसेच त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे पक्षाला महिल चेहरा देण्याच्या विचाराने त्यांचे नाव चर्चेत आहे.

अजित पवार....

अजित पवार हे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सर्वात मोठे नेते मानले जातात. शरद पवार यांच्या खालोखाल अजित पवार यांच्या शब्दाला पक्षामध्ये वजन आहे. अजित पवार यांचा शब्दही पक्षामध्ये अंतिम मानला जातो. त्यामुळे आता शरद पवार हे निवृत्त होत असल्याने त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

जयंत पाटील...

जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे नेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील माजी मंत्री आहेत. राष्ट्रवादी पक्षात त्यांचं स्थान मोठं आहे. त्यामुळे त्यांचं नाव देखील आघाडीवर आहे.

प्रफूल्ल पटेल...

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रामधील एक मोठे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते ४ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत. ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे त्यांचं नाव राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT