Sharad Pawar will retire as NCP president: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे... (Latest Marathi News)
काय म्हणाले संजय राऊत...
शरद पवार यांच्या या मोठ्या निर्णयावर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. ज्यामध्ये "एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप प्रत्यारोप राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता." तसेच शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत," असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हणले आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.