Who is Rashmi Karandikar Saam Tv
महाराष्ट्र

Who is Rashmi Karandikar: महाराष्ट्रातील महिला IPS अधिकारीचा राष्ट्रपती पदकाने गौरव, जाणून घ्या कोण आहेत रश्मी करंदीकर?

Satish Kengar

Who is Rashmi Karandikar:

महाराष्ट्रातील IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांना राष्ट्रपती पदकाने सन्मान करण्यात येणार आहे. पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा या पदकाने सन्मान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील एकूण 753 अधिकाऱ्यांचा राष्ट्रपदी पदकाने गौरव करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर रश्मी करंदीकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. लिंक्‍डइनवर त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठ आधिकारी आणि घरातील सर्वांचे आभार मानले आहेत.   (Latest Marathi News)

कोण आहेत रश्मी करंदीकर?

रश्मी करंदीकर या महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकारी आहेत. करंदीकर यांनी मुंबई विद्यापीठातून सांख्यिकी विषयात B.Sc केले आहे. वर्ष 2000 मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

रश्मी करंदीकर 2004 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना रश्मी करंदीकर यांनी समाजशास्त्रात पीएचडीही केली.

रश्मी करंदीकर यांची महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदांवर कर्तव्य बजावलं आहे. त्या नेहमीच त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे चर्चेत राहिल्या आहेत. मुंबईत सायबर सेलमध्ये काम करत असताना सायबर क्राईमच्या अनेक केसेस त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने मोठ्या हुशारीने आणि कमी वेळेत सोडवल्या आहेत.

सायबर क्राईमच्या केसेस सोडवण्याव्यतिरिक्त त्यांनी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी देखील अनेक उपक्रम हाती घेतले. नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून कसं दूर ठेवता येईल यासाठी देखील त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT