Mumbai Mega Block: रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक; कुठे, कधी, कसा? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Mumbai Train News 28 January 2024: मुंबईत रविवारी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
Mumbai Local Mega Block News For 26 Januar 2024 | Railway mega block on Sunday; Where, when, how? Know complete information in one click
Mumbai Local Mega Block News For 26 Januar 2024 | Railway mega block on Sunday; Where, when, how? Know complete information in one clickSaam TV
Published On

आवेश तांदळे, मुंबई

Mumbai Local Mega Block:

मुंबईत रविवारी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. रविवारच्या मेगा या ब्लॉकमुळे लोकलसेवेवर परिणाम होणार आहे. यामुळे नोकरदारांना वेळेच्या आधीच घरातून बाहेर पडावं लागणार आहे. (Latest Marathi News)

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवरील माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा मांटुगा आणि मुलु्ंड स्टेशनवर नियोजित थांब्यानुसार डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. तर ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ठाण्यातून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यानुसार वळविण्यात येणार आहेत. तर माटुंगा येथे अप जलद मार्गावर सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येणार आहेत. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

Mumbai Local Mega Block News For 26 Januar 2024 | Railway mega block on Sunday; Where, when, how? Know complete information in one click
Mumbai-Pune ExpressWay |मराठा मोर्चा जुन्या घाटातून वळवणार,मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला!

बदलापूरची लोकल केव्हा सुटणार?

डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल सुटणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२० वाजता सुटणार आहे. तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३९ वाजता सुटणार आहे.

तर अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असणार आहे. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. त्यानंतर ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सायंकाळी ४.४४ वाजता पोहोचणार आहे.

Mumbai Local Mega Block News For 26 Januar 2024 | Railway mega block on Sunday; Where, when, how? Know complete information in one click
Mumbai Maratha Andolan News | 2 लाख मराठा बांधवांची नवी मुंबईत जेवणाची व्यवस्था कुठे?

हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. यावेळेत

बेलापूर-उरण आणि नेरुळ-उरण बंदर मार्ग सेवा प्रभावित होणार नाही. तर हार्बर मेगाब्लॉकवर पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डाउन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल . तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.१६ वाजता सुटेल आणि सायंकाळी ४.३६ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल सकाळी १०.१७ वाजता पनवेल येथून सुटेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी ११.३६ वाजता पोहोचेल. पुढे ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.

डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून सायंकाळी ४.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी ०४.५२ वाजता पोहोचेल.

Mumbai Local Mega Block News For 26 Januar 2024 | Railway mega block on Sunday; Where, when, how? Know complete information in one click
Mumbai Breaking News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल दोन वर्षे राहणार बंद? काय आहे कारण? जाणून घ्या

अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी ११.३३ वाजता पोहोचेल. पुढे ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.२६ वाजता सुटेल आणि ठाणे येथे सायंकाळी ५.२० वाजता पोहोचेल.

विशेष लोकल कोणत्या मार्गावर असणार?

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागात विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. तर ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com