Maharashtra weather update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra weather update: आज कुठे बरसणार पाऊस? महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत विजांसह सरींची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Rain alert in Maharashtra: महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी झाला असला तरी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुरू आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. जाणून घ्या आजचा जिल्हानिहाय हवामान अंदाज.

Surabhi Jayashree Jagdish

मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरू आहेत. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये.

दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या मध्य प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र एक्टिव्ह आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राला लागून समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला असून, तो जम्मूपासून डेहराडून, शाहजहानपूर, कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र, रांची आणि दिघामधून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला होता. तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव आणि भंडाऱ्यात राज्यातील सर्वाधिक ३२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वांत कमी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. राज्यातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतायत. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही आणि जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्येही प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान राहून ऊन आणि सावल्यांचा खेळ दिसू शकतो. या भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यातील तापमानाची नोंद

पुणे

कमाल तापमान : २९.२ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २२ अंश सेल्सिअस

अहिल्यानगर

कमाल तापमान : ३१.६ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २४.८ अंश सेल्सिअस

जळगाव

कमाल तापमान : ३१.९ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २३.२ अंश सेल्सिअस

जेऊर

कमाल तापमान : ३१.५ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २१.५ अंश सेल्सिअस

कोल्हापूर

कमाल तापमान : २७.१ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २२.१ अंश सेल्सिअस

महाबळेश्वर

कमाल तापमान : १९.७ अंश सेल्सिअस

किमान तापमान : १७.५ अंश सेल्सिअस

मालेगाव

कमाल तापमान : ३२ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २६.६ अंश सेल्सिअस

नाशिक

कमाल तापमान : २६.९ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २२.२ अंश सेल्सिअस

निफाड

कमाल तापमान : ३०.१ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २२.४ अंश सेल्सिअस

सांगली

कमाल तापमान : २९.२ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २२ अंश सेल्सिअस

सातारा

कमाल तापमान : २८.७ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २२ अंश सेल्सिअस

सोलापूर

कमाल तापमान : ३१.३ अंश सेल्सिअस

किमान तापमान : निरंक

सांताक्रूझ

कमाल तापमान : ३१.५ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २६.९ अंश सेल्सिअस

डहाणू

कमाल तापमान : ३० अंश सेल्सिअस

किमान तापमान : २५.६ अंश सेल्सिअस

रत्नागिरी

कमाल तापमान : ३१.५ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २५.३ अंश सेल्सिअस

छत्रपती संभाजीनगर

कमाल तापमान : ३० अंश सेल्सिअस

किमान तापमान : २३ अंश सेल्सिअस

धाराशिव

कमाल तापमान : निरंक

किमान तापमान : २१ अंश सेल्सिअस

परभणी

कमाल तापमान : ३१.४ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २३.५ अंश सेल्सिअस

परभणी (कृषी)

कमाल तापमान : ३१ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २२.७ अंश सेल्सिअस

अकोला

कमाल तापमान : ३०.८ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २५.८ अंश सेल्सिअस

अमरावती

कमाल तापमान : २९.६ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २३.५ अंश सेल्सिअस

भंडारा

कमाल तापमान : ३२ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २१ अंश सेल्सिअस

ब्रह्मपूरी

कमाल तापमान : २९.४ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २४.२ अंश सेल्सिअस

बुलडाणा

कमाल तापमान : २९.४ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २४.२ अंश सेल्सिअस

चंद्रपूर

कमाल तापमान : ३०.८ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २५.६ अंश सेल्सिअस

गडचिरोली

कमाल तापमान : २८.४ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २४.४ अंश सेल्सिअस

गोंदिया

कमाल तापमान : २९ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २४.४ अंश सेल्सिअस

नागपूर

कमाल तापमान : ३०.७ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २३.४ अंश सेल्सिअस

वर्धा

कमाल तापमान : २९ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २४.५ अंश सेल्सिअस

वाशीम

कमाल तापमान : २८.४ अंश सेल्सिअस

किमान तापमान : २०.८ अंश सेल्सिअस

यवतमाळ

कमाल तापमान : २९.८ अंश सेल्सिअस

किमान तापमान : १९.८ अंश सेल्सिअस

सरासरी तापमान

  • उत्तर महाराष्ट्र : किमान २२.२, कमाल ३२ अंश सेल्सिअस

  • पश्‍चिम महाराष्ट्र : किमान १७.३, कमाल ३१.५ अंश सेल्सिअस

  • कोकण : किमान २५.३, कमाल ३१.५ अंश सेल्सिअस

  • मराठवाडा : किमान २१, कमाल ३१.४ अंश सेल्सिअस

  • विदर्भ : किमान १९.८, कमाल ३२ अंश सेल्सिअस

विजांसह पावसाची शक्यता

आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

UPI पेमेंटवरील शुल्कावरून राजकारण तापलं, UPI TAX रद्द करण्याची राहुल गांधींची मागणी

SCROLL FOR NEXT