पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पाअंतर्गत १५ हजार लाभार्थ्यांना घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. सोलापूरच्या पवित्र भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वांचे वतीने स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"घरं मिळालेल्या सर्व कामगारांचे मनापासून त्यांचेही अभिनंदन करतो. या घरकूल योजनेच्या भूमिपूजन सोहळा मोदींच्या हस्ते झालं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, की चावी द्यायला मीच येणार. त्यानुसार मोदी आज आलेत. यालाच म्हणतात मोदी गॅरंटी", असं म्हणत शिंदेंनी (Eknath Shinde) मोदींच्या गॅरंटी समजावून सांगितली.
"संत तुकारामांनी म्हटलंय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ही म्हण मोदींसाठी तंतोतंत लागू पडते. समृद्धी महामार्गाचं भूमीपूजन आणि लोकार्पण मोदी साहेबांनी (Narendra Modi) केलं. मुंबईतील अटल सेतूचं लोकार्पणही मोदींनीच केलं", असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांचा आढावाच उपस्थितांना उलगडून सांगितला.
"मागच्या वर्षी दोन मेट्रो शुभारंभ झाला. त्याचंही भूमिपूजन मोदींनी केलं होतं. यावरून मोदीजींची गॅरंटी फक्त कागदावर किंवा बोलण्याने नाही, तर वास्तवात उतरते. मोदींच्या हातात यश आहे. असा सत्कर्म आणि भाग्य खूप कमी लोकांच्या वाट्याला येतं. म्हणून मी पुन्हा त्यांचे आभार मानतो", असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आम्ही स्वतःलाही भाग्यशाली मानतो. की अशा नेतृत्वात विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याची संधी मिळाली. मी कालच दावोसहून परतलो महाराष्ट्र सरकारने ३ लाख ५३ हजार कोटींचे करार केले. दीड लाखांहून अधिक करारांना मंजुरी मिळाली. तिथं अनेक देशांचे प्रमुख, अधिकारी, उद्योजक भेटले. सगळ्यांच्या ओठांवर आदरणीय मोदींचंच नाव होतं, मला ऐकून खूप अभिमान वाटलं, असंही देखील शिंदे म्हणाले.
अनेक उद्योजकांना भारतात गुंतवणूक करायची आहे. त्यांनाही गॅरंटी आहे की, मोदी सरकार पुन्हा एकदा या देशात सत्तेत येईल. मोदींच्या सोबत महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार येईल. या कारणामुळं महाराष्ट्रावरही त्यांनी विश्वास व्यक्त केला. अयोध्येतील मंदिराची वीट मोदींनी ठेवली होती. आता तिथं उद्घाटन होतंय. रामलल्लाची प्रतिष्ठापना होतेय. कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न पूर्ण होतं, असंही शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.