शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर बोचरी टीका केली. दावोसची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याआधी राज्यातून गुजरातमध्ये पळलेली गुंतवणूक आणि रोजगार परत आणला, तर मुख्यमंत्र्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल, असं संजय राऊतांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "महाराष्ट्रात महायुतीला लोकसभेच्या ५ जागाही मिळणार नाही अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने महाराष्ट्रात प्रचारासाठी यावं लागतंय"
"महाविकासआघाडी आणि इंडिया गटबंधनचा घेतलेला हा धसका आहे. म्हणून ४८ जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस यांच्या मागे मतदार नाही, हे मोदींनी समजून घेतल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात यावं लागतंय", असं म्हणत राऊतांनी मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर टीका केली.
प्रधानमंत्र्यांनी मणिपूर, काश्मीर खोरे, म्यानमार तसेच लडाखला जावं पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात ते फक्त राजकीय फायद्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
दावोसचा दौरा आमच्यासाठी चांगला झाला असून महाराष्ट्रात ३ लाख ५३ कोटींची विक्रमी गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली होती. यावरून देखील संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"मुंबईत तसेच महाराष्ट्रातून आपली अर्थव्यवस्था आणि रोजगार हा गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आला. दावोसची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याआधी राज्यातून गुजरातमध्ये पळलेली गुंतवणूक आणि रोजगार परत आणा", तरच तुमचा मराठी बाणा दिसेल, असं संजय राऊत म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.