Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: हरियाणात घडलं ते राज्यातही घडणार? महायुतीची सरशी, मविआला फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात हरियाणा सारखाच भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे..त्यामुळे राज्यात हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती होणार ? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट..

Tanmay Tillu

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राजकीय पंडितांबरोबर एक्झिट पोलचे आकडेही चुकले. हे असं कसं घडू शकतं? असा प्रश्न काँग्रेससह इंडिया आघाडीमधील पक्षांना पडला. आता जे हरियाणात झालं, ते महाराष्ट्रात होईल का? हाच प्रश्न आहे.

लोकसभेनंतर हरियाणा, जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर आता भाजपा आणि काँग्रेसची मोठी परीक्षा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपा महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. हरियाणा सारखाच भाजपाला इथे प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे. याआधी लोकसभेला काय घडलं होतं, हे जाणून घेऊ..

लोकसभेनंतर राज्यातील स्थिती

लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला 17 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या इंडिया म्हणजेच मविआ आघाडीला 30 जागा मिळाल्या. लोकसभेला महायुती आणि मविआला जवळपास 43 टक्के मतदान झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय चित्र पूर्णपणे बदलेलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता काय कौल देणार हेच पाहायचं. हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होण्याची शक्यता का आहे. त्याचीही कारणं समजून घेऊ.

हरियाणाची पुनरावृत्ती राज्यात?

काँग्रेस मविआतील मोठा पक्ष आहे. काँग्रेससमोर आघाडी धर्म पाळताना अनेक आव्हानं आहेत. शिवसेना,राष्ट्रवादीच्या फुटीनं जागावाटप अधिक किचकट आहे. ठाकरेंकडून सीएम पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रह आहे. काँग्रेस मोठा पक्ष असल्यानं मुख्यमंत्रीपदावर अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा दावा आहे. हरियाणाच्या निकालाचा काँग्रेसला राज्यात फटका बसण्याची शक्यता आहे.

तर या उलट महायुतीनं लोकसभेच्या पराभवातून धडा घेत अनेक लोकोपयोगी योजनांवर भर दिल्याचं दिसतं. त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुतीकडून कामांचा धडाका

  • लाडकी बहिण आणि अन्य योजना

  • टीका करताना कामांचे दाखले देण्याचा प्रयत्न

  • मुंबईत अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प मार्गी

  • सरकारच्या विकासात्मक कामांचा प्रचार

एकंदरीत,लोकसभेला ज्या नॅरेटीव्हचा फटका महायुतील बसला तो मतदारांच्या मनातून पुसण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय.तर भाजप सोशल इंजिनिअरींगवर भर देतोय. 2019ला विधानसभा निवडणुकीत भाजपाने 105 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा युतीला कौल मिळाला होता. आता राजकीय समीकरणं बदलली असली तरी शिस्तबद्ध निवडणूक लढवण्याचं नियोजन आणि सामाजिक समीकरण साधून महायुती हरियाणाच्या निकालाची राज्यात पुनरावृत्ती करुच शकते एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT