Weather Alert Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: काळजी घ्या! उन्हानं होरपळ, ११ ते ४ चं ऊन त्रासदायक, का होतेय तापमानात वाढ?

महाराष्ट्रातील तापमान ३७ ते ३९ अंशाच्या घरात असणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

weather report :मुंबईत उकाडा वाढत चालला आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये गुलाबी थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळेत घामाच्या धारा सुरू झाल्यात. अशात आता पुढचे दोन दिवस मुंबईकरांसाठी खुप महत्वाचे असणार आहेत. महाराष्ट्रातील तापमान ३७ ते ३९ अंशाच्या घरात असणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि गोवा या राज्यांत देखील उन्हाचा तडाखा वाढणार आहे. (Latest weather report)

मुंबईतील उपनगरांमध्ये देखील उष्णता वाढत चालली आहे. तसेच तापमाणात सकाळी ९ नंतर मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर पडूनका असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

पुढच्या ४ दिवसांमध्ये उत्तरमहाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे त्वचेचे आजार, उष्माघात अशा समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे असणार आहेत.

उष्णाच्या तडाक्यासह हवेतील प्रदूषण पातळी देखील वाढत आहे. सोमवारी मुंबईतील हवेची पातळी अतिशय खाली घसरली आहे. २५६ AQI दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेची देखील माहिती दिली आहे.

तापमानात का वाढ होत आहे ?

चक्रीवादळविरोधी परिसंचरण आणि निरभ्र आकाश यामुळे तापमानाचा पारा अचानक वाढला जातो. तसेच सागरी वारे सुरू होण्यास विलंब म्हणजेच समुद्रावरून येणारे पश्चिमेचे वारे किनारी भागात उशिराने सुरू होत आहेत.

दुपारपर्यंत पूर्वेकडील वारे वाहत आहेत तर समुद्राच्या वाऱ्यामुळे किनारी भागातील तापमान दुपारच्या वेळी खाली येत आहे. त्यामुळे सध्या तापमानात वाढ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Public Toilet Risk: शौचालयातील हँड ड्रायरमुळे आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Jalgaon Corporation Election : जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा करिश्मा करणार? महाविकास आघाडीचा लागणार कस

Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

Nanded Heavy Rain : नांदेड शहराला पावसाचा फटका; नांदेड ते मुदखेड महामार्गावरील वाहतूक बंद

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

SCROLL FOR NEXT