सिद्धेश म्हात्रे
Mumbai Crime : पनवेलमधील खान्देश्वर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खान्देश्वरमध्ये नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडून दोन महिन्यांचा काळ लोटल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Latest Mumbai Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी २ महिन्यांची गरोदर राहिल्याने आईला सदर घटना समजली. आईने खान्देश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांनी पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी आरोपी नराधम बापाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नात्याला काळिमा...जन्मदात्याकडून बालिकेचा विनयभंग
जळगाव तालुक्यात देखील अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत गावातील अल्पवयीन मुलगी ही आई व वडील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. १३ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलीचे वडील घरी आले. त्यावेळी मुलगी घरात अभ्यास करत होती. तिच्या वडीलांनी तिचा हात पकडून तिला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
मुलीने आई घरी आल्यावर तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने लगेचच पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पती विरोध तक्रार दाखल केली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.