Mumbai Crime News : सावधान! उरणमध्ये 'फिरहेराफेरी'टोळी सक्रिय; कारमध्ये सापडली कोटींची रोकड

कारमध्ये तब्बल 10 कोटी रुपये असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSiddhesh Mhatre Saam TV

सिद्धेश म्हात्रे

Mumbai Crime News : नवी मुंबईच्या उरण परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री या परिसरात एका कारमध्ये करोडो रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. पोलिसांना या बाबत आधीच टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या इको कारचा शोध घेतला. या घटनेत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Latest Mumbai Crime News)

अधिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका इको कारमध्ये रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी सापळा रचत इको कारची झडती घेतली असता त्यात रोख रक्कम सापडली आहे. कारमध्ये तब्बल 10 कोटी रुपये असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

उरण शहरात पैसे दुप्पट करुन देतो आशा खोट्या स्कीमचे आमिष दाखवून हे पैसे लुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उरण पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

'फिर हेराफेरी'; बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या बांगुरनगर लिंक रोड पोलिसांनी अशाच एका कॉलसेंटरचा पर्दाफाश केला होता. मालाड पश्चिम परिसरात एका बोगस कॉल सेंटरमध्ये नागरिकांना २४ तासात दुप्पट पैसे करुन देण्याचे आमिष दाखवले जात होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे.

मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगर येथे CIELOX BUSINISS SOLUTIONS LLP या नावाने हे कथित कॉल सेंटर चालवले जात होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून www.visionfxmakets.com या संकेत स्थळावर नोंदणी केलेल्या भारतीय आणि इतर देशांतील लोकांशी इंटरनेट व्हिप कॉलद्वारे संवाद साधायचे. तसेच त्यांना २४ तासांत पैसे दुप्पट मिळतील असे सांगितले जात होते. उरणमध्ये देखील शुक्रवारी सापडलेल्या कारमध्ये मिळालेली रोकड ही अशाच प्रकारे लुटली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com