Prakash Ambedkar On OBC Saam Digital
महाराष्ट्र

Prakash Ambedkar On OBC: ओबीसी चळवळच आम्ही सुरू केली, नांदेडच्या मेळाव्यात प्रकाश आंबेकडकरांचा दावा

Prakash Ambedkar On OBC: नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर नांदेडला आले आहेत. पहिल्यांदाच ते ओबीसीमंचावर येत आहेत.

Sandeep Gawade

Prakash Ambedkar On OBC

नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर नांदेडला आले आहेत. पहिल्यांदाच ते ओबीसीमंचावर येत आहेत. मात्र ओबीसी मंचावर येण्याची ही माझी पाहिली वेळ नाही, ओबोसी चळवळच आम्ही सुरू केली आहे. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. नांदेडमधील मेळाव्याला छगन भुजबळ का आले नाही असं विचारलं असता मला माहीत नाही त्यांना विचारा असं उत्तर आंबेडकर यांनी दिलं आहे.

लोकसभेच्या जागा वाटपाबाबत येत्या नऊ तारखेला दिल्लीत बैठक होणार आहे. पण या बैठकीबद्दल मला काहीच माहिती नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 12-12 चा प्रस्ताव सगळ्यां समोर आहे. याबाबत अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत. 9 तारखेच्या बैठकीत महाविकास आघाडीकडून बोलवलं जाईल अशी आशा आहे का असं विचारलं असता माणूस आशेवरच जगतो असं ते म्हणाले. 'आंबेडकर यांच सगळच ऐकल जाईलच असं नाही' असं विधान सुशील कुमार शिंदे केले होते, यावर विचारलं असता 'ते त्याचं मत असल्याची प्रतिक्रिया आंबेडकर यानी दिली. 

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात लोणिकंद-थेऊर फाटा येथे भीषण अपघात

PM Kisan Yojana: ९.७ कोटी शेतकर्‍यांना आज खुशखबर मिळणार! ₹२००० च्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता

Sharad Pawar : शरद पवारांना सोलापूरमध्ये पुन्हा धक्का, कोठेंसह दिग्गजांनी हातात घेतलं कमळ

Govinda Hospitalised : अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, तडकाफडकी रुग्णालयात दाखल

Succcess Story: जिद्द! पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी, सोलापूरमधील शेतकऱ्याची लेक झाली क्लास वन अधिकारी, वाचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT