water scarcity in melghat near amravati  Saam Digital
महाराष्ट्र

Melghat Water Scarcity: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

अमरावती जिल्ह्यात पारा 44 डिग्री गेला असतांना एवढ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासीना संघर्ष करावा लागतो आहे तर दुसरीकडे राजकीय पुढारी निवडणूकीत व्यस्त आहेत.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमल गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला होता. पाणीपुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात आदिवासी महिलांना सर्व कामे सोडून हंडा भर पाण्यासाठी टँकरची चातकासारखी वाट पाहावी लागते आहे. (Maharashtra News)

मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात गेल्या दोन वर्षा पासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. गावातील विहिरी संपुर्ण कोरड्या पडल्या आहेत. गावात टॅंकरने अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असून टॅंकरने पाणी गावातील विहिरीत सोडल्या जाते व तेथून ते पाणी भरण्यासाठी गावातील गरोदर महिला, मुले विहिरीतून हंडाभर पाण्यासाठी दिवसभर राबत असल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडून पाण्याचे टँकर कमी येत आहे. प्रशासनाचे केलेले मदतीचे दावे फोल ठरल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राहुल येवले यांनी केला आहे.

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईची दाहकता वाढत असतांना शासन- प्रशासनाद्वारा ही परीस्थिती गांर्भियाने घेतली जात नसल्यानेच पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचा आरोप येथील आदिवासी बांधव करु लागले आहेत.

पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना मेळघाट मध्ये राबविल्या जातात पण त्या फक्त कागदावरच. त्याचा फायदा आदिवासींना होताना दिसत नाही. जिल्ह्यात 65 गावात विहिरी अधिग्रहित केल्या असून 13 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावती जिल्ह्यात पारा 44 डिग्री गेला असतांना एवढ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासीना संघर्ष करावा लागतो आहे तर दुसरीकडे राजकीय पुढारी निवडणूकीत व्यस्त आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT