water logged in disaster management office of dharashiv Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv Rain : धाराशिवला पावसाने झाेडपलं, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात शिरलं पाणी, फकीरा नगरातील रहिवाशांची बिकट स्थिती

water logged in disaster management office of dharashiv : धाराशिवमध्ये झालेल्या पावसामुळे फकीरा नगर भागात घरातील ज्वारी भरून ठेवलेली पोती पाण्यात भिजली. ज्वारी आणि धान्याचे मोठं नुकसान झाले.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात पावसाचे पाणी शिरले. यामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील महत्वाचे साहित्य भिजले. पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील रस्त्यावर पाणी साचले. परिणामी वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली हाेती.

पावसाच्या पाण्यामुळे धाराशिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक बोट, दोरखंड व इतर साहित्य भिजले. या प्रकाराची आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पाहणी केली.

धाराशिव शहरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. फकीरा नगर भागातील घरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसारपयोगी साहित्य पाण्यात भिजले. यामुळे नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे. गटार तुडुंब भरून रोडवर पाणी जमा झाल्यानें हेच पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

SCROLL FOR NEXT