Krishna River News Saam Tv
महाराष्ट्र

Krishna River News: कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली, पुराचा धोका; सांगली महापालिका अलर्ट मोडवर

Sangli News : कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत चालल्याने महापालिका प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे.

विजय पाटील

सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत चालल्याने महापालिका प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पूर पट्ट्यात पहिल्यांदा बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महापालिकेच्या टीमकडून सांगलीतील जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट आदी परिसरात जाऊन तेथील नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या.

पाण्याची पातळी अचानक वाढली तर कोणतीही जीवितहानी होऊ नये, याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. तसेच पाणीपातळी वाढली तरी महापालिकेच्या तात्पुरता निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केले.

दरम्यान, सांगलीच्या एका बाजूला कृष्णा व वारणा नद्यांना पूरसदृश्य स्थिती असताना दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ दुष्काळग्रस्त लोकांवर आली आहे. पुराचे वाहून जाणारे पाणी मिळावं, यासाठी जतच्या संखमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी संखमध्ये गुड्डापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून व्हस्पेट आणि गुड्डापूर तलाव भरून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांकडून सहा महिन्यांपूर्वी 26 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसल्याने, संतप्त झालेल्या दुष्काळग्रस्तांनी आज संखमध्ये रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला.

महापुरामध्ये कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी म्हैसाळ सिंचन योजनेतून मिळावे, या प्रमुख मागणीसाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर जलसंपदा विभागाकडून तातडीने कामाला सुरुवात करण्याचा आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19' च्या घरात तान्या मित्तल ढसाढसा रडली, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : 'सिरप' प्रवर्गातील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन- चिट्ठी शिवाय विक्री करू नये

Urban Land Fragmentation: शहरातील प्लॉटधारकांना सरकारचा मोठा दिलासा, जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द, वाचा काय घेतला निर्णय

ITR Refund: ITR रिफंड प्रोसेस दिसतंय पण पैसे मिळाले नाही? काय करावे? वाचा सविस्तर

Massive fire : हायवेवर मोठी दुर्घटना, २ तासात २०० सिलिंडरचा स्फोट, भयावह घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT