सांगली : कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढून पाणी पातळी १८ फुटावर गेली आहे.
मागील तीन- चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी संततधार सुरु आहे. विदर्भ, नागपुरात पावसाने हाहाकार माजविला असून सांगलीत (Sangli) देखील पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या प्रत्येक नागरिकांचे सध्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष आहे.
अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरु
कृष्णा खोऱ्यातील (Krishna River) पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठा १.९ टीएमसीने कमी करून शनिवारी ९७ टीएमसी ठेवला आहे. धरणात सध्या ७९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून १ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.