Washim Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Washim News : वाशिम विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात देखील बंडखोरी झाली आहे. अर्थात त्याचा धक्का ठाकरे गटाला बसणार आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: महायुती व महाविकास आघाडी यांच्यात विधानसभेची खरी लढत पाहण्यास मिळत आहे. मात्र नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. अशाच प्रकारे वाशीम मतदारसंघात ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे वाशिममध्ये महायुतीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीत यंदा बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यान वाशिम (Washim) विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात देखील बंडखोरी झाली आहे. अर्थात त्याचा धक्का ठाकरे गटाला बसणार आहे. मात्र निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असताना मतदानाला केवळ दोनच दिवस बाकी आहेत. अशात वाशिममधील बंडखोर उमेदवार राजाभैय्या पवार आणि निलेश पेंढारकर यांनी (BJP) भाजपात प्रवेश केला आहे. 

त्यांच्यासोबत वाशिम नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा आणि युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी देखील भाजपमध्ये सामील होऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार श्याम खोडे यांना पाठिंबा जाहीर केला. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद अधिक वाढणार असून तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीला निर्णायक लाभ होईल; अशी माहिती भाजपाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे पत्रकार परिषदेत दिली.

रिसोड, कारंजा मतदारसंघालाही फायदा 
तर या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे वाशिमसह रिसोड आणि कारंजा या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे बंडखोर नेते आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या पदाधिकाऱ्यांचा भाजपाला झालेला पाठिंबा, निवडणुकीत भाजपाच्या संधी अधिक बळकट करणारा ठरू शकतो; असेही राजु पाटील राजे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT