पंढरपूर : सांगोल्यात शेकापने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. यावर निशाणा साधताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी कामगार पक्ष हा भाजपची बी टीम असून येथील शेकपचा उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांनी उभा केला असल्याचे मोठं वक्तव्य केले आहे.
सांगोल्यात (Sangola) उबाठा गटाने दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. तर शेतकरी कामगार पक्षाने डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरले आहे. तर शिवसेनेने आमदार शहाजी पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे. येथील जागेवरून उबाठा आणि शेकापमध्ये चांगलेच जुंपले आहे. या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेकाप ही भाजपची बी टीम असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
तो उमेदवार फडणवीसांचा
एवढेच नाही तर सांगोल्यात उभा करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस म्हणून उभा असल्याचा खासदार राऊत यांनी दावा केला आहे. राऊत यांच्या आरोपामुळे राजकीय गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव
दरम्यान सांगोल्यातील अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांच्यावर विरोधी गटाकडून पाठिंब्यासाठी दबाव टाकला जात आहे; अशी तक्रार अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांनी केली आहे. घरासमोर गोंधळ घातला जात आहे. माझा जिवीताला धोका निर्माण झाला आहे; अशी लेखी तक्रार अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.