Washim Fire News  Saam TV
महाराष्ट्र

Washim Fire News : रात्री सर्व गाढ झोपेत असताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; आगीत दोन घरं जळून खाक

Fire News : घरासह शेजारी मोहब त्र्यंबक पुंड यांच्या घरातील लाखो रुपयांचं संसारोपयोगी साहित्य 110 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालं आहे. यामुळे त्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय.

Ruchika Jadhav

मनोज जयस्वाल, वाशिम.

Washim :

वाशिमच्या वाडी रायताळ गावात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन घरं देखील जळून खाक झालीत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाडी रायताळ गावात ही घटना घडली आहे. गावातील सुभाष सदाशिव पुंड यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत त्यांच्या घरासह शेजारी मोहब त्र्यंबक पुंड यांच्या घरातील लाखो रुपयांचं संसारोपयोगी साहित्य 110 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालं आहे. यामुळे त्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय.

सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली तेव्हा सुभाष पुंड यांचं घर बंद होतं. त्यामुळे येथे जीवितहानी टळली. रात्रीच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीचा मोठा भडका उडाला आणि आगीनं रौद्र रूप धारण केलं. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्यानं त्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही.

रिसोड पोलीस आणि नगर परिषदेची अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन घरं जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

गावांमध्ये सिलिंडरचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली होती. चिखली शहरातील गजानन नगरमधील रहिवासी गौरव कुलकर्णी यांच्या राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि लगेचच आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikona Fort History: महाराष्ट्राचा त्रिकोणी रत्न! तिकोना किल्ल्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि ट्रेकिंग अनुभव जाणून घ्या

Maharashtra Live News Update: विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी संबंध नाही लक्ष्मण हाकेंची जहरी टीका

Onion Ban: कांदा न खाण्याची अनोखी परंपरा! भारतातील 'या' ठिकाणी कांदा खात नाहीत

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT