Wasim Accident 
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; टायर फुटून कारची डिव्हायडरला धडक, ३ जण जखमी

Washim Accident : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या. एका अपघातात बाप लेकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या एका अपघातात कुटुंबातील ३ जण जखमी झालेत.

Bharat Jadhav

मनोज जैस्वाल, साम प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दुसरा अपघात झाला. टायर फुटल्याने कारने महामार्गावरील दुभाजकाला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झालेत. हा अपघात वाशिमच्या कारंजा तालुक्यातील दोनद लोकेशन १७५ वर झाला. या अपघातात पती,पत्नीसह मुलगा जखमी झाला आहे.

पुणे येथील भलमे कुटुंबीय कारने समृद्धी महामार्गावरून नागपूरला जात होते. अचानक धावत्या कारचा समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावर धडकली. डॉ. नितीन विठ्ठलराव भलमे (४८), प्रियंका नितीन भलमे (३७ ) व दानिश नितीन भलमे ( रा.बालेवाडी पुणे) जखमी झालेत. तर मृणाल भलमे (१४) ही सुखरूप बचावली. अपघाताची माहिती श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना समजताच त्यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य स्वामी महाराज रुग्णवाहिकेचे चालक नितीन पाटील यांना घटनास्थळी रवाना केले.

तेथून जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. येथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. त्यावेळी हायवे एचएसपी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व कारंजा लोकेशन समृद्धी अग्निशामक दल हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते.

ट्रक-कारच्या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू

वाशिममध्ये महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये ३ जण जखमी झालेत. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. समृद्धी महामार्गावर सकाळी ११.४५ वाजता हा अपघात झाला.

ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे चालकाने महामार्गाच्या कडेला ट्रक उभा केला होता. याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ वर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला.

सिमेंट वाहतूक करणारा टँकर पलटी

मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT