Selu Rain Effect संजय डाफ
महाराष्ट्र

वर्धा: सेलूत वादळाचे तांडव; घरांसह गोठ्यांवरील छप्परही उडाले!

सेलू तालुक्यातील काही भागात गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसासह वादळवाऱ्याने अनेक घरांच्या छप्परांसह शेतातील गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

संजय डाफ

वर्धा : सेलू तालुक्यातील काही भागात गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसासह वादळवाऱ्याने अनेक घरांच्या छप्परांसह शेतातील गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.

प्राप्त माहितीनुसार गुरुवार आणि शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील सेलू शहराच्या काही भागात, धानोली (मेघे), घोराड तसेच जुवाडी (धानोली) परिसरात मान्सूनपूर्व पावसासह (Pre Monsoon) वादळाने चांगलाच कहर केला. गुरुवारी सेलू (Selu Taluka) शहरातील शिक्षक कॉलनीत वादळामुळे अनेक झाडांसह वीजेचे खांब उन्मळून पडले. धानोली (मेघे) परिसरात तीन घरांवरील छप्पर उडून गेले तसेच वीजेचे खांब देखील पडले आहेत. यामुळे काही काळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता.

पावसाची (Rain) चाहूल लागताच वीज पुरवठा (Electricity) खंडित होणे ही तालुक्यात नित्याचीच बाब झाली आहे. यासोबतच घोराड येथील बाबाराव सुरकार यांच्या दोन्ही घरांवरील छप्पर उडाले. प्रमोद राऊत यांच्या घराची भिंत देखील कोसळली. विठ्ठल मंदिराजवळील काही दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले. ज्ञानेश्वर महाकाळकर यांच्या शेतातील गोठ्याचे छप्पर देखील उडाले.

हे देखील पाहा-

काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळात जुवाडी (धानोली) परिसरातील प्रकाश बडेरे यांच्या शेतातील गोठ्यावरील संपूर्ण छत उडून गेले. यामुळे त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. वादळवाऱ्याने झालेल्या नुकसानीचा पंचनामा संबंधित विभागाकडून सुरू करण्यात आला असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

Success Story: वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IPS; सृष्टी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

LPG Cylinder Price :एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, तुमच्या शहरात दर किती? वाचा

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT