ऑफिसमधील सहकाऱ्याला डेट करत असाल तर, या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

आपल्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी आहेत, जी आधी सहकारी (Colleges) होती म्हणजेच एकाच ऑफिसमध्ये काम करत होती पण नंतर कपल्स बनली.
Dating
DatingSaam Tv
Published On

आपल्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी आहेत, जी आधी सहकारी (Colleges) होती म्हणजेच एकाच ऑफिसमध्ये काम करत होती पण नंतर कपल्स बनली. पण जर तुम्ही नीट बघितले तर असेही काही लोक असतील ज्यांनी ऑफिस गॉसिप आणि टॉक्सिक रिलेशनमुळे नोकरी गमवली. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप चांगले मित्र मिळतात किंवा काय माहिती तुम्हाला तुमचा पार्टनर देखील इथेच मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या नजरेत कोण असेल तर तुमच्या सहकर्मचाऱ्याला डेट करणे (Dating with coworker) यात काही चुकीचे नाही. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला त्या चुका टाळायच्या (Mistakes of dating a colleague) आहेत ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

कलीगसोबत डेटिंग करणे योग्य आहे की नाही?

खरे तर ही पूर्णपणे तुमची वैयक्तिक बाब आहे. अश्याही काही कंपन्या आहेत त्यांचे याबाबत कठोर नियम आहेत. त्यामुळे सहकाऱ्याला डेट करण्यापूर्वी ते तुमच्या कंपनीच्या धोरणाच्या विरोधात तर नाही ना हे जाणून घ्या. जर तुमचा जोडीदार तुमचा जुनिअर असेल, तर तुमच्यासाठी हे जरा जास्तच धोकादायक प्रकरण असू शकते. दुसरीकडे, तो सिनिअर असला तरी आपल्या करिअरला यामुळे नुकसान पोहोचण्याची भीती आहे. अशा वेळी कोणत्याही नात्याचा पाया रचण्यापूर्वी एकमेकांसाठी काही नियम बनवणे गरजेचे आहे. जे तुम्हाला तुमच्या कामात आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन निर्माण करण्यात मदत करेल.

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इंदूरच्या अपोलो हॉस्पिटलचे मानसशास्त्रज्ञ डॉ. आशुतोष सिंग यांच्याकडून डेट करताना कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊया-

1. आपली प्रायव्हसी जपून ठेवा;

ऑफिसमधील सहकार्‍यासोबतचे आपले नातेसंबंध आणि आपले व्यावसायिक जीवन यांचा समतोल कसा साधायचा याबाबदल सांगताना, डॉ. आशुतोष म्हणतात, "तुम्ही तुमच्या सहकार्‍याला डेट करण्यास सुरुवात केली तर याबाबद्दल, गॉसिप होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल खात्री होत नाही तोपर्यंत ऑफिसमध्ये या विषयावर चर्चा करणे टाळणे महत्वाचे राहील. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही हे नाते पूर्णपणे गोपनीय (Private) ठेवावे. तुमच्या नात्याच्या सुरुवातीच्या तुमच्या नात्याबद्दल काळात सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या पोस्ट करणे शक्यतो टाळा.

2. नेहमी प्रोफेशनल वागा;

प्रेम आणि जवळीक असणे वाईट नाही, परंतु हे सर्व तुमच्या कामाच्या ठिकाणी नाही. तुमची इमेज व्यावसायिक अशीच राहिली पाहिजे. लक्षात ठेवा की वैयक्तिक संबंध तुमच्या व्यावसायिक वृत्तीवर खूप परिणाम करू शकतात. त्यामुळे कामानंतर, जेव्हा तुम्हा दोघांना वेळ मिळेल तेव्हा भेटा किंवा एकमेकांसाठी वेळ काढा, जेव्हा तुम्ही एकत्र असाल तेव्हा ऑफिस किंवा कामाबद्दल चर्चा करू नका.

3. कामाच्या ठिकाणी वैयक्तिक मतभेद विसरून जा

तुम्ही कलीगला डेट करत असतानाही तुम्ही तुमचे काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवायला हवे. ऑफिसमध्ये तुमच्या जोडीदारासोबत झालेल्या वाद मधे आणू नका. वैयक्तिक आयुष्य कधी कामाच्या मध्ये येऊ देणार नाही असा नियमचं बनवा आणि शक्य असल्यास या गोष्टी तुमच्या पार्टनरसोबत पण शेअर करा. कामाच्या ठिकाणी चिडचिड करू नका. मूड खराब असेल तर तुमच्या रागामुळे तेथील वातावरण नकारात्मक बनवू नका.

त्यामुळे जेव्हा तुम्ही कामावर असता, तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे आणि त्या जागेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उपस्थित राहणे हे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही सहकार्‍याला डेट करत असाल, तेव्हा ती व्यक्ती कायम तुमच्या समोर असल्याने तुमचे लक्ष फक्त त्या व्यक्तीकडे असू शकते, पण असे करू नका, आणि असे असल्यास याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काम आणि प्रेम यांच्यात योग्य ते संतुलन राखण्यासाठी, काही सवयी लावून घ्या. तुमचे ध्येय वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या एकत्र वाढणे असावे.

4. ई-मेलवरून बोलणे टाळा;

प्रेमात पडल्यावर एकमेकांना खूप काही सांगायचे असते. तुमचा जोडीदार तुम्हाला असे काहीतरी सांगतो जे दिवसभर तुमहाला लक्षात राहते. ते आठवून कधीही तुम्हाला हसू येते आणि त्यानंतर मनाला छान वाटते. या गोष्टींमुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. पण इमेलद्वारे मेसेजेस शक्यतो टाळा, कारण जर तुम्ही दोघांनी कधी ब्रेक-अप करायचं ठरवलं किंवा तुमचे भांडण झाले तर हेच मेसेज तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

कोणत्याही वैयक्तिक कम्युनिकेशनसाठी ऑफिस ईमेल कधीही वापरू नका. तसेच हे व्यावसायिक नैतिकतेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे प्रायव्हसी राखण्यासाठी एकमेकांना भेटण्यासाठी आणि भरपूर बोलण्यासाठी वेगळा वेळ काढा.

5. इतरांसोबतचे संबंध भांडणाचे कारण बनवू नका;

डॉ आशुतोष हे सल्ला देतात, “जेव्हा तुम्ही दिवसभर एकाच ऑफिसमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला एकमेकांचे बोलणे, वागणे हे खूप चांगल्या प्रकारे समजते. पण तुमच्या इतर मित्रांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाबद्दल कधीही जजमेंटल होऊ नका. काही लोक मनमोकळे असतात, काही लोक चांगल्या संवादावर विश्वास ठेवतात. त्यामुळे असा स्वभाव असलेल्या व्यक्तीबद्दल काहीही गैरसमज करू नका. तुमच्या पार्टनरला दुसरं कोण चांगलं बोलत असेल तर पार्टनरबद्दल कोणतेही वेगळी मत बनवू नका. तुमच्या बॉससोबतचे तुमचे वागणे, इतर सहकर्मचार्‍यांशी किंवा तुमच्या बॉस किंवा इतर सहकार्‍यांसोबत तुमच्या मित्राचे वागणे हे पाहून तुमच्या वैयक्तिक नात्यात वाद निर्माण करू नका."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com