Wardha Police Saam tv
महाराष्ट्र

Wardha Police : उडीसा येथून गांजा तस्करी; १०२ किलो गांज्यासह एकाला अटक, वर्धा पोलिसांची कारवाई

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : उडीसा येथून वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांज्याची तस्करी होत असल्याची माहिती वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गिरड परिसरात सपळा रचून तब्बल १०२ किलो गांजा जप्त करत एकाला अटक केली. मात्र दोघेजण फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने या तस्करीचा भांडाफोड केल्याने पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी गुन्हे शाखेला ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले.

वर्धा (Wardha) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांज्याची तस्करी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना कारवाईचे आदेश दिले होते. माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक तैनात करण्यात आले होते. अशातच वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील रहिवासी सुरज वासेकर हा उडीसा येथून मोठ्या प्रमाणात गांजा वर्धा जिल्हात घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. (Police) पोलिसांनी गिरड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची चार पथक तैनात करून वाहनाला ताब्यात घेण्यासाठी सहा टॅक्टरांची मदत घेतली. संशयित कार दिसताच पोलिसांनी कारला अडवत तपास केला असता यात १०२ किलो गांजा आढळला. पोलिसांनी कारचालक सुरज वासेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केला असता हिंगणघाट येथील आशिष हाडके व सेवाग्राम येथील अस्मित भगत यांचाही या गुन्ह्यात सहभाग आढळला आहे. 

संपूर्ण राज्यात ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. अश्यातच वर्धेत स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेने मोठ्या तस्करीचा भांडाफोड केला. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईला पोलीस अधीक्षकांनी पन्नास हजारचे बक्षीस जाहीर केले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड याच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, संतोष दरेकर, संदिप गाडे, हवालदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, राजेश तिवस्कर, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, महादेव सानप, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, रामकिसन ईप्पर, प्रदिप वाघ, मनीष कांबळे, अरविंद इंगोले, अखिल इंगळे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Navaratri 2024 : मुंबईत 'या' देवीच्या मंदिरातील भिंत आहे खूप खास, सर्व इच्छा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT