Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Wardha News : बुधवारी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात वर्धा नगरपालिकेच्या प्रभागाचे आरक्षण काढण्यात आले असून लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आगामी काळात होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने तयारी सुरु असून नगरपालिकांतील प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. यामुळे नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचे देखील निश्चित झाले आहे. मात्र या प्रभाग आरक्षणाच्या सोडतीमुळे काहींचे गणित जमले आहे; तर काहींचे बिघडले असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे नगरपालिकेचा रणसंग्राम तापणार असल्याची चित्र आहे. 

साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या होत्या. आता न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. तीन दिवसांपूर्वी सहाही नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर लगेच बुधवारी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात वर्धा नगरपालिकेच्या प्रभागाचे आरक्षण काढण्यात आले असून लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. 

चार नागरपालिकांवर महिलाराज 

आरक्षण सोडतीनंतर नगराध्यक्षानंतर आता नगरसेवकांचेही आरक्षण ठरले असून आता खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे. जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी (रेल्वे) या सहा नगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सहापैकी चार नगरपालिकांवर महिलाराज निश्चित झाल्याने अनेकांना धक्का बसला. मात्र यामुळे राजकीय गणित बिघडणार आहेत. 

अनेकांना बसला धक्का 

आज नगरसेवकांचेही आरक्षण जाहीर झाल्याने काहींचे गणित चांगलेच जमले असून, काहींचे गणित बिघडल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. काही अतिउत्साहींनी नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमातून तयारी सुरू केली होती; पण आरक्षणानंतर जबर धक्का बसल्याने चेहऱ्यावरचे पाणी पळाल्याचेही चित्र दिसून आले. मात्र ज्यांचे गणित जुळून आले, त्यांच्या तयारीला वेग येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विट्यात निघाला कॅन्डल मार्च

SCROLL FOR NEXT