Wardha News saam tv
महाराष्ट्र

Wardha News: रेल्वे सुरक्षा जवानामुळे परत मिळाली साडेचार लाख रुपये किमतीच्या दागिण्यांची बॅग

Woman's Lost Purse Recovered: कगदपत्रांवरील पत्त्याच्या आधारे याची माहिती महिलेच्या मुलाला देण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

>>चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Local News Update: रेल्वे गाडी पकडण्याच्या धावळीत महिला रेल्वे स्थानकावर बॅग विसरली. या बॅगमध्ये साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिणे होते. रेल्वे पकडण्यात यश आले, मात्र पर्स हरवल्याने महिलेचा जीव कंठाशी आला. सुदैवाने ही पर्स रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती लागली आणि त्यांनी महिलेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. यानंतर कुटुंबियांनी याची माहिती महिलेला दिली आणि तिचा जीव भांड्यात पडला. रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होतंय.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास महिलेची पर्स बेवारस स्थितीत बाकावर मिळून आली. रेल्वेच्या सुरक्षा रक्षकाला ही पर्स सापडली. त्यांनी पर्सची तपासणी केली असता त्यात सोन्या चांदिच्या दागिण्यासह रोख रक्कम आणि आवश्यक कागदपत्रे मिळून आली.

कागदपत्रावरून ही पर्स शहरातील ठाकरे मार्केट येथील रहिवाशी शेख मुकिन यांची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहिती सेवेवर असलेल्या प्रधान आरक्षक युवराज तलमले आणि सुनील कुमार यांना देण्यात आली. रेल्वेचे पोलीस निरीक्षक आर. एस. मीना यांना माहिती देत सेवाग्राम स्थानकावर दोन पंचासमोर पर्स उघडली.

या पर्समध्ये दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, पाच सोन्याच्या अंगठ्या, सहा ग्रॅम वजानाचे कानातील लटकन, आठ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, एक सोन्याचे मंगळसूत्र, एका तोळ्याची सोन्याची पोत, तीन नग चांदिच्या तोरड्या, एक मोबाईल, घड्याळ, रेल्वे तिकीट, डेबिट, क्रेडीट कार्डसह पर्स असा चार लाख ३९ हजार ४९० रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. (Latest Political News)

यानतंर कगदपत्रांवरील पत्त्याच्या आधारे याची माहिती महिलेच्या मुलाला देण्यात आली. आरपीएफ पोलीस ठाण्यात हजर होत ओळख दाखवून गहाळ झालेल्या दागिणे कागदपत्राची पडताडणी करून पर्स महिलेच्या मुलाकडे सुपूर्द करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

Makar Sankranti : मकर संक्रांतीला चंद्रासारखे खुलेल रूप, चमकदार अन् मऊ त्वचेसाठी 'गाजर'चा असा करा वापर

मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा, के आन्नामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान

SCROLL FOR NEXT