Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : पावसाळ्यात पिके वाचविण्यासाठी पिकांना द्यावे लागतेय पाणी; दोन आठवड्यापासून पावसाची उघडीप

Wardha News : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले होत. यात अनेकांची शेती खरडून गेल्याने पेरणी वाहून गेली. जून महिन्यात जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नव्हता

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: राज्यभरात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. कडक उन्हाचे चटके जाणवत असून पावसाने दडी मारल्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी देखील सध्या संकटात सापडला आहे. सुवातीला पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. नंतर तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने पिके खरडून निघाली. तर आता पावसाने दोन आठवड्यापासून दगा दिल्याने पिके कोमेजू लागली आहेत. यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्याने पिकांना पाणी द्यायला सुरवात केली.

वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन याचा शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. या पाठोपाठ शेतकऱ्यांनी तुरी लागवड देखील केली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले होत. यात अनेकांची शेती खरडून गेल्याने पेरणी वाहून गेली. जून महिन्यात जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नव्हता; यामुळे यंदा पेरण्याही उशिरा झाल्या. आता तर पावसाअभावी पिके मान टाकत आहे. दोन दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवलं जाईल अशी शक्यता आहे.

सोयाबीन, कापसाला पाणी 
आर्वी तालुक्यातील जीवापूर शिवारात महादेवराव डहाके यांचे शेत आहे. त्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीन पिकाची लाववड केली आहे. मागील दोन आठवड्यापासुन पावसाने दडी मारल्यामुळे आता पिके कोमेजत आहे. सध्या पिकांना वाचवण्यासाठी त्यांनी पिकांना पाणी द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे पाऊस येईपर्यंत पिकांना जीवदान मिळेल; अशी आशा आहे. मात्र पाणी पुरेसे नसल्याने केवळ दोन एकर ओलीत होऊ शकते अशी परिस्तिती आहे. 

उत्पन्नात घट होण्याची भीती 

या सर्व परिस्थितीमुळे यंदा उत्पनात घट होण्याची शक्यता आहे. एकीकडे शेतीला पिकाविण्यासाठी खर्चात मोठी वाढ झाली आहे. तर आता पावसाच्या कमतरतेमुळे उत्पन्नात घट होऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसात पावसाचे आगमन झाल्यास पिके वाचण्याची शक्यता आहे. दरवर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकतो. यावर्षीही हीच परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवलेली दिसत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

पाकिस्तानच्या 'वाढीव' बॉलरची अर्शदीप सिंगनं मैदानातच काढली लायकी; व्हिडिओ होतोय व्हायरल, Video

Rain Alert : महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढचे ६ दिवस राहा सतर्क!

Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT