Karanja News : रेशन तांदूळाचा काळाबाजार; कारंजा तालुक्यात मोठी कारवाई, ६५० पोते तांदूळ जप्त, दोन गोदाम सील

Washim News : गोदाम क्रमांक १ मध्ये तांदूळाचे अंदाजे ३५० ते ४०० तर गोदाम क्र.२ मध्ये अंदाजे २२० ते २५० तांदूळचे पोते आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात तांदुळाचा साठा करत काळाबाजार करण्यात येत असल्याचे समोर आले
Karanja News
Karanja NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा करण्यात येणाऱ्या रेशन धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार वाशीमच्या कारंजा तालुक्यात उघडकीस आला आहे. अनेक दिवसांपासून हा काळाबाजार सुरू असून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील कोळी तुळजापूर शिवारातील दोन गोदामावर धाड टाकून कारवाई करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात तांदुळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

वाशिमच्या कारंजा तालुक्यात कारवाई करण्यात आलेले गोदाम हे अमिर गुंगीवाले यांचे मालकीचे असल्याचे समोर आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे कोळी येथील दोन गोदामावर छापा टाकला असता गोदाम क्रमांक १ मध्ये तांदूळाचे अंदाजे ३५० ते ४०० तर गोदाम क्र.२ मध्ये अंदाजे २२० ते २५० तांदूळचे पोते आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात रेशन तांदुळाचा साठा करत काळाबाजार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  

Karanja News
Akola : मुदतबाह्य कीटकनाशकांची पुन्हा नवी पॅकिंग; अकोल्यात समोर आला धक्कादायक प्रकार

दोन्ही गोदामांना लावले सील 

दोन्ही गोदामात मिळून अवैधरित्या साठवून ठेवलेले तांदूळाचे ६५० पोते म्हणजे अंदाजे ७ लाख रुपयांचा तांदूळ जप्त करुन गोदामला सीलबंद करण्यात आले आहे. तसेच दोन्ही गोडाऊनला सील लावण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३,७ नुसार गुन्हा दाखल करण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. तांदूळाच्या साठेबाजीचे हे प्रकरण ताजे असतांना २४ दिवसातच मोठी कारवाई पहायला मिळाली आहे.

Karanja News
Nandurbar Police : नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करी; पोलिसांनी कारवाई करत ९ लाखाचा साठा केला जप्त

संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून गोडाऊनचा वापर नेमका कशासाठी केला जात होता? धान्याचा स्त्रोत काय? आणि ते कोणत्या मार्गे कुठे तस्करीसाठी वापरण्यात येणार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली आहे. या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या २५ जूनला सुध्दा तालुक्यातील दोनद बु व सोहळ- गायवळ येथे धाडी टाकून साडे सहाशे पोते अवैध तांदूळाचे पोते जप्त करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com